पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

न करता दुसऱ्या कोणाच्या भल्यासाठी धडपडणे अशा प्रकारची वागणूक निसर्गात बरीच दिसते. हत्तिणींच्या कळपात माद्या इतर हत्तिणींच्या पिल्लांवरही आपल्या पिल्लाइतकीच माया करताना दिसतात. त्याला आपले दूध पाजतात. ते घाबरून ओरडू लागले, तर जीवाचा आटापिटा करून त्याच्याजवळ जातात आणि त्याला संरक्षण देतात. अनेक प्राणी एकमेकांना धोक्याचे इशारे देतात. खारी, विविध पक्षी यांचा या दृष्टीने अभ्यास झाला आहे. समजा, जवळजवळ अशी दोन घरटी आहेत आणि एका पक्ष्याला वरून घिरट्या घालणारा ससाणा दिसला, तर तो पक्षी ओरडून शेजान्याला सावध करतो. हा त्यागच आहे, कारण असे ओरडल्यामुळे आपण ससा - यालाही इशारा देतो. आपली जागा त्याय कळते. आपलीच शिकार होण्याचा संभव वाढतो. मधमाशा, मुंग्या, काही गांधिलमाशा असे अनेक कीटक मोठ्या संख्येने एकत्रपणे राहतात, पण बरेचदा अशा वस्तीतील बहुसंख्य कीटक स्वतः प्रजोत्पादन करत नाहीत. त्यांचे सर्व आयुष्य दुसऱ्याच्या पिल्लांचा सांभाळ करण्यातच जाते. पोळ्यातील कामकरी मधमाशा वांझच असतात. पण पेपर वास्प या जातीच्या गांधिल- माशा अंडी घालणे शक्य असून तसे करत नाहीत. ( या माशा लाकूड चावून त्याचा लगदा करून त्यापासून कागद बनवतात आणि पोळे बांधण्याकरता वापरतात म्हणून त्यांना पेपर वास्प असे नाव आहे. ) उत्क्रांतीची सर्व प्रेरणा ही प्राण्याला स्वतःचा वंश वाढवण्याला उद्युक्त करते. मग ही उलटी तन्हा शिल्लक का उरते ! अशा वर्त- णुकीला जबाबदार जीन्स नष्ट का होत नाहीत ! त्यागाचे टोक म्हणजे बलिदान. मधमाशा पोळ्याच्या रक्षणाकरता प्राणाची आहुती देतात. त्या कोणाला चावल्या की त्यांचे पोट फुटून त्या मरतात. जपानी कामिकाझी वैमानिक दुसऱ्या महायुद्धात, बॉंबने भरलेल्या विमानासकट अमेरिकन बोटींवर उडी घेत. त्या बोटींचा विध्वंस करीत स्वतः परलोकी जात. म्हणूनच मधमाशांना निसर्गातले कामिकाशी वैमानिक म्हणायला हवे. अशा प्रकारच्या अल्ट्रइस्टिक किंवा त्यागी वागणुकीचे स्पष्टीकरण उत्क्रांतिवादी शास्त्रज्ञांना शोधून सापडेना. शेवटी सुमारे वीस वर्षांपूर्वी हॅमिल्टन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने हे कोडे सोडवले. त्याच्या मांडणीला म्हणतात 'कीन सिलेक्शन.'

 डार्विनच्या 'ओरिजिन ऑफ स्पीसीज... ' या पुस्तकात ही संकल्पना मुळात सापडते. मधमाशांचे पोळे म्हणजे एक कुटुंब आहे आणि नॅचरल सिलेक्शनचा सबंध

तुझ्यावाचून करमेना / ७३