पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[९] धर्मशास्त्र न सहोदर अशी दोन कारणे त्यांस आहेत. व असंसृष्ट सहोदरास संसृष्ट होणे हे कारण कमी आहे, अर्थात त्यास हिस्सा मिळू नये. श्लोक ॥ कात्यायन: ।। अन्योदर्यस्तुसंसृष्टीनान्योदयोधनंह रेत् ॥ असंसृष्ट्यपिवादद्यात्मसृष्टोनान्यमातृजः ॥ ८॥ संसृष्ठ सावत्र भावाचे धन कोणी घ्यावें याजबद्दल.- कांही सहोदर व काही भिन्नोदर असे उभयतां विभक्त झाल्या नंतर पुनः संसृष्ट होतील नेवर काही दिवसांनी पुनः विभागाची संधि येईल तर परस्परांचे धनाचा विभाग सम व्हावा. दोघे सहोदर असून त्या पैकी एक सहोदर व एक मिन्नोदर असे उभयतां संसृष्ट होऊन पुढे काही दिवसांनी संसृष्ट झालेला निपुत्रिक सहोदर मृत होईल तर त्यांचे धन भिन्नोदर संसृष्टी व सहोदर असंसृष्टी या उभयतांनी समान वांटून घ्यावं. दोघे सहोदर आणि एक भिन्नोदर असे त्रिवर्ग असून विभक्त झाल्या नंतर दोघे सहोदर संसृष्ट होतील आणि भिन्नोदर असंसृष्ट असून त्या सहोदर संसृष्टी - की एक निपुत्रिक संसृष्ट मरण पावेल तर त्याचे धन सहोदर संसृष्टीनेच घ्यावें. असंपृष्ट भिन्नोदरास काही मिळणार नाही. सहोदर असंसृष्ट असून त्यास निपुत्रिक मन संसृष्ट सहोदराच्या जिनगीतून विभाग मिळावा व असंसृष्ट भिन्नोदर असल्यास त्यास मृत संसृष्टीचे जिनगीतून विभाग मिळू नये, ह्मणून वरील रकमेत सांगितले आहे तर त्यांत इनकाच भेद आहे की, संसृष्ट झाल्याने त्या भिन्नोदरास मालकी येते व अससृष्ट सहोदरास एकोदराचा संबंध असल्यामुळे मालकी स्वयमेव आहे सबब असंसृष्ट भिन्नोदरास मृताचे जिनगीचा हिस्सा मिळावा हे योग्य आहे. आतां मृत संसृष्टीचे पुत्र, पौत्र व प्रपौत्र असे असतील तर मृताच्या सर्व धनावर मालकी त्यांचीच आहे दुसरे कोणाची नाही; परंतु क्रमाने ह्मणजे पुत्रा नंतर पौत्र व प्रपौत्र यांणी घ्यावे. श्लो० ॥ नार० ॥ भरणंचास्यकुरिन्खीणामाजीवनक्षयात् ॥९॥ मृत संसृष्टाची बायको असेल तर तिजला मृतसंसृष्ट भर्त्याचा विभाग न मिळतां फक्त अन्नवस्त्र मात्र मृताचें धन ज्याच्या ताब्यांत येईल त्याजकडून मिळेल: परंतु संसृष्ट झाल्या नंतर पुनः विभक्त होऊन तिचा नवरा निपुत्रिक मरण पावले तर त्याच्या धनाची मालकी त्या स्त्रीकडेस होईल. तसेच भ्रतार आणि स्त्री संमन झाले असून भ्रतार मरण पावेल आणि त्यास पुत्र पौत्रादिक संतती नसेल तर त्या धनावर त्या स्त्रीचीच पूर्ण मालकी होईल. श्लोक ॥ शंख०॥नारदः॥ यातस्यदुहितास्तस्याः पित्रंशाभ्दरणंमतम् ॥ आसंस्काराद्धरेभ्दागंपरतोविकृयात्पतिः ॥१०॥ मृत संसृष्टीचो कंन्या असेल तर मृताचें धन ज्याचे ताब्यांत येईल त्याणे त्या