पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्मशास्त्र. उदाहरण.क आणि ख हे दोघे भाऊ प्रथमतः एकमेकांशी विभक्त होऊन नंतर खचा मुलगा ग हा कशी जर एकत्र मिळेल तर क आणि ख यांशी संसृष्ट न म्हणतां अविभक्त असंसृष्ट असें म्हणावें. संसृष्टीत किती भेद आहेत? द्रव्य संसृष्ट व उदर संसृष्ट असे दोन प्रकारचे भेद आहेत. उदर संसृष्ट ह्मणजे एका उदरांतून उत्पन्न झालेले परस्पर व भिन्नोदर ह्मणजे एका उदरांतून उत्पन्न झालेले नव्हेत ते ज्यांच्या आया निरनिराळ्या ते परस्पर एक पुरुष आणि त्यास दोघी बायका किंवा त्या दोहोंहून अधिक असतील तर त्या प्रत्येक बायकांची मलें परस्पर सापत्न बंधु होतात; परंतु त्यांतून एकीस झालेली मुले ती परस्परांशी सहादर होतात. व सापत्न बंधु हे भिन्नोदरांतच गणावे. तसेच आई, बाप, चुलते. पुतण, बायको, आजा, आजी इत्यादिक सर्व भिन्नोदरच आहेत असे समजावे. आणि त्यांस द्रव्य संसृष्ट असे म्हणावे. म श्लोक || याज्ञवल्क्यः ॥ संसृष्टिनस्तुसंसृष्टि ॥ साधारण नियम. पुत्र नसेल तर संसृष्टीचें धन संसृष्टीने घ्यावं. लाक ॥ मनुः ॥ संसृष्टाः सहजीवंतोर्विभजेयर्धनंयदिसमस्तत्र मक विभागस्याज्जैष्ट्यंतत्रनविद्यते ॥४॥ विभक्त झालेले पुनः तेच एकत्र होऊन पूर्वीचे किंवा नवीन मिळालेले अशा एकंदर धनाचा त्यानांच पुनः विभाग करणे झाल्यास समान विभाग व्हावा. अशा प्रसंगी विषम विभाग होणार नाहीत. वरील कलमा बद्दल विचारांतर. प्रथमतः स्थावर जंगम मालाचा जो विभाग झाला असेल त्या विभागाचे वेळी जे धन ज्यास आले असेल त्यांतील धन परस्परांनी कांहीं व्यय न करितां तसेच त्या धना सहवर्तमान संसृष्ट होतील तर मात्र समविभाग होईल. जर असें नसेल तर होणार नाही. श्लाक । याज्ञवल्क्यः ॥ दृश्याद्वातद्विभागः स्यादायव्ययविशोधितात् ॥ ५॥ संसृष्ट झाल्या नंतर पुनः विभाग करणे झाल्यास त्या दोघांमध्ये जो आदा व खर्च झाला असेल त्याचा विचार करून विभाग करणे तो सम किंवा विषम करावा. उदाहरण.-क आणि ख या उभयतांचा प्रयमतः विभाग होतेवेळेस एक मनुष्यास आपआपल्या हिश्शाप्रमाणे पांच पांचशे रुपये आले असून नंतर कांहीं दिवसांनी उभयतांमध्ये पुनः एकत्र व्हावे असे ठरले तेव्हां एक मनुष्यापाशी वि