पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अथ संसृष्ट प्रकरण प्रारंभः व्याख्याः -संसृष्ट संसृष्टीतील संसर्ग व असंसृष्ट याचा विचारः-- मयुखपंक्ति । विद्यमानंभाविवाधनंआवयोः पुनर्विभागावधिः ॥ साधारणमित्याकारिताबुद्धिरिच्छावासंसर्गः ॥ १ ॥ प्रथमतः संसृष्ट या पदांतील संसर्ग याचा अर्थ काय आहे तो सांगतो.संसृष्टि यांतील संसर्ग ह्मणने विद्यमान द्रव्य असेल तें व परस्परांस भावी जे मिळणार ते द्रव्य पुनः विभाग होई पर्यंत समाईक असावे, असा उभय पक्षी संकेत होऊन एकत्र राहतात त्या राहण्यास संसर्ग असें ह्मणावे. संसृष्टि मणजे काय याजबद्दल उपपादनः श्लोक ॥ बृहस्पतिः ॥ विभक्तोयः पुनः पित्राभ्रात्राचैकत्रसंस्थितः ॥ पितृव्येणाथवाप्रीत्याततः संसृष्टउच्यते ॥ २ ॥ संसृष्ट ह्मणजे प्रथमतः जे ज्याशी विभाग होऊन पुनः तेच त्याशी आपआपल्या संतोषाने विभक्ताशी एकत्र मिळतात; त्या मिळणारांस संसृष्ट असें म्हणावें. संसृष्ट धन म्हणजे काय ! जे संसृष्ट होणार ते जे धन घेऊन एकत्र मिळतात तें धन व एकत्र मिळाल्या नंतर जे धन मिळतें तें धन अशा दोन्ही धनांस संसृष्ट धन असें ह्मणतात. कोण कोणाशी कोणकोणत्या रितीने विभाग व्हावा याजबद्दल दायविभाग प्रकरणांत सांगितले आहे. म्हणोन या प्रसंगी विस्तार केला नाही. कोण कोणाशी विभक्त होऊन पुनः कोण कोणाशी मिळाले असतां संसृष्ट होतात ते सांगतो:___प्रथमतः आई, बाप, चुलता, भाऊ, पुत्र, नातु, बायको, पुतणे, इत्यादिक परस्परां विभक्त होऊन पुनरपि तेच एकत्र मिळाले असतां ते संसृष्ट होतात असे समजावें. असंसष्ट झणजे काय व ते किती प्रकारचे .. आहेत यांचे उपपादन.. वर लिहिलेले आई, बाप, भाऊ, इत्यादिक एकमेकांशी विभक्त झाल्या नंतर तेच पुनः एकमेकांशी मिळतील तर संसृष्ट होतात म्हणोन सांगितले आहे. आ. तां विभक्त झाल्या पैकी एकाद्याचा पुत्र किंवा पौत्र व प्रपौत्र विभक्त झाल्या मिळतील तर ते संसृष्ट होत नाहीत. अविभक्त असंसृष्ट असे समजावे. तसेच भावांपैकी दोघे संसृष्ट होऊन एक अवशिष्ट राहील तर तो विभक्त असंसार दोन प्रकारचे भेद आहेत.