पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वतनदा मारण.. हत्यारवंद, हेलकरी, चाकर, इत्यादि० बद्दल.-राजकी उपद्रवाने झणजे राजाने लुटले असेल, दैविक उपद्रव ह्मणजे अकस्मात दरवडा, वीज, अगर घर पडून, नदी, ओढा इत्यादिकांचा पूर येऊन बुडाले असेल किंवा नासले असेल, अगर अग्नीने जळाले असेल ह्यांवांचून हेलकरी, चाकर, मजूर, शिपायाच्या हयगईनें वस्त्र, भांडी, धान्य, फळफळावळ इत्यादिक जिनसा नासल्या किंवा हरवल्या असतील तर चाकर किंवा कारीगर, किंवा मजूर, अगर हेलकरी यांजपासून भरून घ्याव्या, तसेच यजमान याणे गांवास जाण्याकरितां सांगितले असतां न ऐकतां खोटी करील तर मजूर इत्यादिकांस जो पगार ठरविला असेल त्याचे दुप्पट त्यांजपासून घ्यावा. श्लोक || याज्ञवल्क्यः ॥ प्रक्रांतेसप्तमंभागंचतुर्थपथिसंसजन् । भूतिमर्धपथेस प्रदाप्यस्त्याजकोपिच ॥ ८॥ १. यजमानानें गांवास जाण्याचा बेत करून शिपाई, चाकर, मजूर इत्यादिकांस जाण्यास सांगितले असून त्यांणी जाण्याविषयी कबूल केले. आणि तो स्वतः जात नसून आपल्या मोबदला दुसऱ्यासही पाठवीत नाही. तर त्यांजला जो पगार कबूल केला असेल त्याचा सातवा भाग कमी करून बाकी पगार त्यांस द्यावा. जर मार्गाने जात असून मध्यंतरी काम सोडील तर पगाराचा चौथा हिस्सा कमी करावा. जर अर्ध्या मार्गात काम टाकील तर काहींच देऊ नये. २, यजमान एकवार चाकर ठेवून देशांतरास जात असतां, चाकर, मजूर इत्यादिकांस वाटेने जात असतां रजा देईल तर वरील नियमाप्रमाणे यजमान याजकड़न चाकर इत्यादिकांस पगार देववावा; परंतु चाकर किंवा यजमान या उभयतांपैकी कोणासही देहउपद्रव ह्मणजे दुखणे आले असेल तर वरील नियम लागू नाही. ३. जो कोणी चाकर किंवा कारीगर किंवा मजूर यांपैकी कोणास आजार झाला नसन आंग दांडगाईने तो काही काम करीत नसेल, तर त्याजला चाकरीवरून दूर करून काहीच पैसा देऊ नये. समाप्त.