पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दायांवभाग प्रकरण. (२) समाईक कुटुंयांत विधवेच्या सासऱ्याने स्वसंपादित मिळकत मिळविली असून तो मयत जाह ल्यावर त्या मिळकतीचा वारसा त्याचे पुत्रांकडे (विधवेच्या नवन्याचे भावांकडे) आला असता ती मिळकतं वडिलोपार्जित आहे असे समजले पाहिजे, आणि त्या मिळकतींतन अन्नवस्व मिटण्याचा दावा विधवेस आपल्या दिरावर करण्याचा हक पोंचतो. इं. लॉ.रि. मुं. सी. व्हा. ११ पृ. १९९० (३) विधवेचे दिरास मयतं सांसांची मिळकत मिळाली असता त्याने त्या विधवेस अन्नवस्व दिलें, पाहिजे. ई. लॉ. रि. क .सी. व्हा. १७ पृ. ३०३. (४) समाईक कुटुंबांत विधवेने आपले दिरावर अन्नवस्खचा हुकूमनामा मिळविला असतां दिराचे मरणानंतर त्याचा वारसपुत्र असेल तथापि त्या हुकूमनाम्याचे वजावणीत कुटुंबाची मिळकत जप्त होऊ शकत नाही. पुन्हा निराळा अन्नवखाबद्दल दावा केला पाहिजे. इं. लॉ. रि.म. सी. व्ही. १० पृ. २८३. पंक्ति ॥ येतमेवविधिकुर्यादित्यादि ॥ कर्कशाशंकितव्यभिचाराडते निर्णयः ॥ ८४ ॥ नवऱ्या पासून निराळी राहून अन्नवस्त्र घेण्याबद्दल नवन्यावर फिर्याद कर ण्याचा स्त्रीस अधिकार नाही. ती व्यभिचारकर्म करणारी नसल व घटस्फोट झाला नसेल परंतु व्यभिचारकर्म करिते अशी शंका मात्र असेल तर तिजला नवऱ्याने आपल्यापासून वेगळी ठेवून अन्नवस्त्र मात्र दिले पाहिजे. विशेष समजूत. (१) नवरा गैरचालीचा असल्यामुळे किंवा त्याजपाशी राहिले असता तो अन्न वख देत नसल्यामुळे किंवा अशाच प्रकारच्या दुसऱ्या एखाद्या योग्य कारणामुळे त्याजपासून वेगळे रहाणे बायकोस भाग आहे, असे बायकोनें शाबीत केल्यावांचून तिला निराळे अन्नवख मागण्याचा हक नाही. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. २ पृ. ६३४. (२) विधवेच्या नवऱ्याने तिला तिचे अन्नवखाचे बदला पैका बिन अटीने दिला असेल तर अगदी तिचा पैका होता, आणि ह्मणून त्या पैक्याने जी तिने स्थावर मिळकत मिळविली असेल त्या मिळकतीची विल्हेवाट मृत्युपत्राने तिला करण्याचा अधिकार आहे. इं. लॉ. रि. म. सी. व्हा. १ पृ.१६६. (३) बायकोस व पुत्रास अन्नवख घेण्याचा जरी हक आहे तरी कुटुंबाचे कर्ज देण्यासाठी मिळकत विकली गेली असता त्या प्रसंगी खरेदीदारापासून त्यांत अन्नवख मिळण्याचा हक रहाणार नाही. ई. लॉ. रि. म. सी. व्हा. २ पृ. १२६. (४) बादी जिवंत आहे तो पर्यंत प्रतिवादीने वादीस दरसाल अन्नेवखबिद्दल अमुक रकम देत जावी असा हुकमनामा झाला असेल, आणि नंतर प्रतिवादी मयत होईल तर त्याचे पुत्राचे हाती प्रतिवादीची जी मिळकत आलेली असेल तितक्या मिळकती पुरता वादीचा हुकूमनामा त्या पत्रावर बजाविण्यास हरकत नाही. इं. लॉ. रि. म. सी. व्हा. ५ पृ. २३१.. (५) नव-याचे मिळकततूिन बायकोस अन्नवख मिळण्याबद्दलचा ठराव झाला असला तथापिती मिळकत तिच्या नवऱ्याने कर्ज फेडण्या साठी विकली असेल व खरेदीदाराने प्रामाणिकपा योग्य मोबदला देऊन खरेदी घेतली असेल तर त्याजवर त्या बायकोचा अन्नवखाबतचा चालणार नाही. ई. ला, रि. अ.सी, व्हा. ५ पृ. ३६७.