पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दायविभाग प्रकरण. निर्णय करावा. कारण अविभक्त भावांची सर्वां मिळून एकच पंचमहा यज्ञादिक कमें चालत असतात व विभक्त झाले असतां हे धर्म निरनिराळे करावे लागतात याजवरून विभाग झाला हे सिद्ध करावें. श्लोक ॥ नारदः । साक्षित्वंप्रातिभाव्यंचदानंग्रहणमेवचविभक्ताः भ्रातरः कुर्युनाविभक्ताः परस्परे ॥ ७९ ॥ साक्ष, जामिनकी, दणे, घेणे इत्यादिक व्यवहार प्रत्येकाच्या अनुमती वाचून विभक्त झालेले भाऊ करूं शकतात, अविभक्त बंधु करू शकत नाहीत, या कारणा वरून विभक्त झाले हे सिद्ध केले पाहिजे. श्लोक ॥ याज्ञ० म० वृ० वि० ना० ॥ अतीतायामप्रजसिबांधवा स्तदवाप्रयुः ॥ अनंतरः सपिंडाद्यास्तस्यतस्यधनहरतयश्चार्थहरसपिंडदायीति ॥ अपुत्रक्षत्रविद श्रद्रापत्नभ्रिातृविवर्जिताः ॥ एषां धनोहरोराजासर्वस्यापिपतिहिंसः ॥ ८०॥ अ या नांवाची स्त्री मयत झाली तिच्या जवळचा वारस चुलत दीर असतो त्याणे तिच्या गैर चालीच्या कारणाने तिचे क्रियाकर्मातर केले नाही ह्मणोन तिचे दुसरे भाऊबंद वारसदार होते त्यांणी केले, त्या वारसां पैकी व याचा पुत्र क याजला मयत अ इचे सासऱ्यास दत्तक दिला असोन तोही मयत झाला असतां अ इच्या इस्टेटीचे वारस कोण होतील अशी शंका घेऊन निवारण.-- जवळचे वारसदार असून दुसरे दूरचे वारसांनी मयताची क्रिया कर्मांतर केल्या कारणाने ते बारस होतील असे नाही. मुख्यत्वेकरून जवळचेच वारस होतील असे समजले पाहिजे. जर मयत झालेली शूद्र जातींतील स्त्री असून ती मरणाच्या अगोदर भ्रमिष्ट असेल तर तिचें इस्टेट राजाने घ्यावे. इतर कोणीही वारस होऊ शकणार नाहीत. असे वरील वचना वरून होत आहे. ( उदाहरण रूपाने स्पष्टीकरण करितो.) मिताक्षरायांपंक्ति ॥ अपुत्रस्यतर्यातस्यपत्नीतिमयूखेसत्वेयथाऋ णादानेअधिकारोनास्तितद्वत्ग्रहणेपि ॥ स्थावरेपुत्रपरतंत्रत्वात् ॥ ८॥ विधवा स्त्री व तिचे पुत्र असे ( सज्ञान व अज्ञान ) एकंदर आवभक्त असून त्या विधवा स्त्रीने आपल्या सज्ञान पुत्रास सोडून नवऱ्याचे कर्ज वसूल करण्याकरिता अज्ञान पुत्राचे पालन करणारी ह्मणून कुळावर फिर्याद करील तर चालणार नाही. कारण नवऱ्याच्या पश्चात् त्याची इस्टेट घेण्यास त्याचे पुत्रच अधिकारी आहेत जर पुत्र अज्ञान असतील तर मात्र पुत्राचे पालन करणारी म्हणून त्या स्त्रीसजि. र्याद करण्याचा अधिकार आहे. .