पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दायविभाग प्रकरण. बाकी सर्व धन अवरस पुत्रास द्यावे. कारण अवरस पुत्र झाल्याने दत्तकाची मालकी कमी होते आणि त्या अवरस पुत्राची मालकी बापाचे सर्व इस्टेटीवर उत्पन्न होते. आतां विधिपूर्वक दत्तक झाल्या कारणाने त्यास चतुर्थांश मात्र मिळावा. याहून अधिक हिस्सा अवरस असे तो पर्यंत दत्तकास मिळणार नाही. विशेष समजूत.. (१) बायको गरोदर असतां दत्तक पुत्र घेतला असेल ते दत्तविधान व्यवहारोपयोगी आहे. आणि पुढे औरस पुत्र जाहला असतां दत्तक पुत्रास मिळकतीचा मिळेल. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा .. १२ पृ.१०५.. श्लोक ॥ या०॥ सजातीय्येष्वयंमोक्तस्तनयेषुमयाविधिः ॥६६॥ वरील एकंदर कलमांत पुत्रादिकांस विभाग मिळण्या विषयी जो प्रकार सांगितला आहे तो सजातीय्य विवाहित स्त्रीस झालेल्या पुत्रा विषयी मात्र जाणावा.. श्लोक ॥ या०॥ जातोपिदास्यांशूद्रेणकामोंशहरोभवेत् ॥ ६७॥ १. शूद्रापासून सजातीय दासीचे ठायीं झालेला पुत्र पिता जिवंत असतां पित्याचे इच्छेनें हिस्सा घेण्यास पात्र होतो. जर लग्नाच्या बायकोचे पुत्र असून विभाग न करितां पिता मरण पावला असेल तर अवरस पुत्र यांणी विभाग करते, वळेस दासी, पत्रास आपल्या वांच्याचा अर्धा हिस्सा द्यावा. जर लग्नाचे बायकोचे पुत्र किंवा कन्या अगर कन्येचा मुलगा असे कोणी वारस नसतील तर पित्याची. सर्व जिनगी. दासीपुत्रासच घेण्याचा अधिकार आहे. २. मूळ श्लोकांत मुद्दाम शद्रा पासून दासीचे ठायीं झालेल्या पुत्रास विभाग धावा असे सांगितल्यावरून ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यां पासून दासीच्या ठायीं शालला पत्र पित्याची इच्छा असेल तरीही विभागास पात्र होत नाही. अर्थात वाप मरण पावल्या नंतर विभाग मिळण्या विषयी सांगणे नको. फक्त बापाने किं. पात्याचे जे वारस असतील त्यांणी दासी पुत्रास अन्नवस्त्र मात्र द्यावे.. विशष समजूत. (1) शुद्ध ज्ञातीतील अनौरस मलास निदान काही प्रसंगी वारसा मिळतो. मयतास औरस मली असोन दासीपुत्र असेल तर त्या दासीपुत्रास अन्नवख मात्र मागण्याचा हक आहे. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. १ पृ. ९७. (२) शूदजातीच्या एका मयतास एक औरस पत्र व दुसरा अनौरस पुत्र असेट तर अनौरस पुत्रास मिळकतीचा निम्मे हिस्सा मिळणे वाजवी आहे; परंतु ते दोघे एकत्र असतां औरस पुत्र मयत झाल्यामुळे सर्व मिळकत अनौरस पुत्रास मिळाली पाहिजे.ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. १ पृ.३७. (३) वरप्रमाणे. इं. लॉ.रि. क. सी. व्हा. ११ पृ. ७०२.. (3) शूदजातीच्या रखेली औरतेपासून झालेले पुत्रास, त्या बापापासून अन्नवख घेण्याचा हक आहे. ई. लॉ. रि. म. सि. व्हा. ८ पृ. ३२५.