पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्मशास्त्र. 1) सख्या किंवा दत्तक पत्राने कांहीं पैका घेऊन बाप किंवा आज्याचे वडिलोपार्जितः मिळकती बराल आपला हक्क सोडून दिला असेल आणि त्यांचे मरणानंतरही हिस्सा मागणार नाही अत कबूल केले असेल तरी विशेष योग्य कारणे नसतील तर आज्याचा कायदेशीर वारस नातू होतो आणि बापाचे मरणानंतर त्याचे विधवेत मिळकतीचा वारसा न मिळतां विभक्तः राहिलेले पुत्रासच मिळेल. ई. लॉ.रि. म. सी. व्हा.. ३ पृ. ५४, लाक ॥ याज्ञव० ॥ असंस्कृतास्तुसंस्कार्या भातृभिःपूर्वसंस्कृतैः भागिन्यश्च ॥ ५५॥ पिता मृत झाल्यानंतर बंधु व बहिणी असंस्कृत ह्मणजे लग्न, मुंजी न झालेले असतील तर त्यांचे संस्कार आई बाप जिवेत असतां ज्या बंधूच्या. मुंजी व ल झालेली आहेत त्यांणी करावे. श्लोक ॥ याज्ञव० ॥ निजादशाहत्वांशेतुतुरीयकम् ।। ५६ ॥ भावांनी आपआपल्या अंशांतून चतुर्थांश देऊन असंस्कृत भागनीचे विवाहादिक करावे असे सांगितल्या वरून कन्या देखील पित्याच्या पश्चात विभागाच्या अधिकारी होतात, असे समजले पाहिजे; एका पुरुषासः पुत्र व कन्या अशी आहेत तर सर्व द्रव्याचे २ विभाग करून त्यांतील एका भागाचा चतुर्थांश कन्येस द्यावा. भा-. की एक भाग आणि ३ चतुर्थांश पुत्रांनी घ्यावे. जर २ पुत्र व एक कन्या आहे तर सगळ्या पितृधनाचे ३ भाग करून त्यांतील एका विभागाचा चतुर्थीश कन्येस. देऊन बाकी २ विभाग आणि दोघां पुत्रांनी वांटून घ्यावे. जर एक पुत्र आणि २ कन्या अशा असतील तर सर्व धनाचे ३ हिस्से करून, त्यांतील एका हिशाचे. चार वांटे करून, दोन वांटे दोघी कन्यांस देऊन बाकी दोन भाग आणि : पत्रांनी ध्यावे. या प्रमाणे भाऊ व बहिणी यांजविषयी विषम विभागाची योजना करावी.. याच प्रमाणे मनूचेही मत आहे, म्हणून तेही लिहिले आहे. श्लोक ॥ मनुः ॥ खेभ्योशेभ्यस्तुकन्याभ्यःमदद्यादातरः पृथक् ॥ स्वस्मादंशाचतुर्भागंपतितास्युरदित्सवः ॥ ५७ ॥ भावांनी असंस्कृत भागनीचे विवाह समाइक द्रव्यांतून केले ह्मणजे तिजला वरील कलमांत सांगितल्या प्रमाणे चतुर्थांश हिस्सा देण्याचे कारण नाही, असें. किती क ग्रंथकारांचे मत आहे; परंतु त्या मताप्रमाणे करावे तर (याज्ञवल्क्य मनुः मेतिथि) इत्यादिक ऋषींच्या वचनास बाध येतो, कारण या वचनांत असे सांगितआहे की, समाईक द्रव्यांतून असंस्कृत भागनीचे संस्कार करून त्यांस व संस्कृ जे लग्न झालेल्या अशा उभयतांस बंधु विभाग न देतील तर ते पतित. दोषयुक्त होतील. याजकरितां भगिनीस हिस्सा दिला पाहिजे. श्लोक ॥ याज्ञवल्क्यः ॥ अन्योन्यापहृतंद्रव्यविभक्तेपत्तुदृश्यते ।। - पनस्तैःसमेरंशोभिजेरनितिस्थितिः ॥ ५८॥