पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दायविभाग प्रकरण. विभागकाळी समजण्यांत आले असेल तर प्रसृत होई तो पर्यंत वाट पाहून नतर विभाग करावा, अगोदर विभाग करूं नये. श्लोक ॥ याज्ञवल्क्यः ॥ पितृभ्यांयस्ययदत्तंतत्तस्यैवधनंभवेत् ॥५३।। विभागा नंतर उत्पन्न झालेल्या पत्रास आई बापाचे सर्व धन घेण्याचा आधकार आहे ह्मणून मागे सांगितले आहे; परंतु जर विभक्त पिता किंवा माता विभक्त पुत्रास ममतेने काही आलंकारादिक देतील तर विभागा नंतर झालेल्या पुत्रांनी त्याजावषयी हरकत करूं नये. व दिलेलें परतही घेऊ नये. ज्यास जे दिले असेल त्याचीच मालकी त्याजवर आहे. नवीन उत्पन्न झालेल्या पुत्राची मालकी त्याजवर नाही असे समजावे. तसेच विभागा नंतर ज्या पुत्रास जे धन आई बाप याणी प्रीतीने दिले असेल तें धन विभागा नंतर पुत्र झाला नसोन ते आई बाप मरण पावतील तर प्रीतीने दिलेल्या धनाचा विभाग न होतां बाकी राहिले असेल तें धन पुनः विभागाचे वेळेस सर्व पुत्रांनी समान वाटून घ्यावे. श्लोक ॥ याज्ञव० ॥ पितुरूव॑विभजतांमाताप्यंशंसमंहरेत् ॥ ५४ ॥ बाप जिवंत असतां पुत्रास हिस्सा करून देते समयों आपली स्त्री ह्मणजे पुत्राची आई इजला पुत्राच्या हिश्शा समान हिस्सा द्यावा म्हणून पूर्वी सांगितले आहे; परंतु वाप विभक्त किंवा अविभक्त मरण पावला असून आईस स्त्रोधन मिळाले नसेल तर बापाचे धनाचा हिस्सा पुत्र करूं इच्छितील त्या प्रसंगी आपल्या हिश्शा बरोबर आईस हिस्सा द्यावा. जर स्त्रीधन मिळाले असेल तर विभाग देण्याचे कारण नाही. तिचे पोषण मात्र करावें, विभक्त झाल्यानंतर आपआपल्या हिश्शास आलेले धन व विभक्त झाल्यानंतर मिळविलेलें धन या दोनी धनावर विभक्ताचीच मालकी आहे असें सत्ता प्रकरणांत सांगितले असून वरील रकमेंत विभक्त झालेल्या पुत्रांनी आई बापाचे धन ध्यावे ह्मणोन सांगितले आहे. याजवरून विरोध येतो, परंतु तो विरोध पुत्राच्या ठिकाणी समजू नये. आई व बाप यांचे धनावर पुत्राची मालकी विभक्त झाल्याने कमी होत नाही. त्यांची मालकी अविभक्ताप्रमाणेच आहे, असे समजले पाहिजे. जर भाऊबंद विभक्त झाले असून निपुत्रिक मरण पावतील तर मात्र त्या धनावर भावावंदाची मालकी नसून विभक्त होऊन मृत झालेल्या बंधूच्या बायकोचीच आहे असे समजावें, विशेष समजूत. (१) कोणी स्त्री जन्मांध नसून तिचा नवरा मरण्यापूर्वी तिला अंधत्व प्रात्प झाले होते त्यामुळे नव - न्याचे निळकतीचा वारसा मिळायास प्रतिबंध येत नाही. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. १ पू. १७७,