पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मनोन दायविभाग प्रकरण रितां सर्व दायोदांनी त्या स्त्रियांस अन्नवस्त्र देऊन पोषण करावें. विशेष समजूत. (१) मयत सोबती हिस्सेदारांची रखेली औरत, अन्नवख घेण्याचा आपला हक्क सांगत असेल तिला पातिव्रत्य धर्माने वागविणे भाग आहे. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. १२ पृ. २६. बृहस्पतिः ॥ कृतानंचाकृतान्नेनपरिवर्त्यविभज्यते ॥ ४० ॥ सिद्धभक्ष पदार्थ ह्मणजे शिजलेले अन्न असेल तर त्याचा विभाग न होतां सर्व दायादांनी मिळून भोजन करावें; परंतु ज्याची इच्छा भोजन करण्याची नसेल त्यास अन्नाचे मोबदला धान्य द्यावें. मयुखपंक्ति ॥ इष्टंयागविप्रभोजनादितदर्थमविभागदशाय मत्यायव्ययेनोत्सृज्यपृथक्स्थापितंतेनद्रव्येणसधर्मस्तेनैवकार्यः॥ धर्मवास्तगोप्रसारक्षेत्रादिनविभाज्यम् ॥ ४१ ॥ धर्मशाळा, देवालय, नदीचा घांट इत्यादिक बांधण्या बद्दल, व बाम्हण भोजन करण्या बद्दल वडिलानी किंवा अविभक्त कुटुंबा पैकी कोणी एकानें समाईक द्रव्यांतून संकल्प करून कांहीं द्रव्य ठेविले असेल तर त्या द्रव्याचा विभाग ने होतां ज्याणे संकल्प केला असेल त्याणेच त्या कामाकडे त्याचा खर्च करावा. धर्मशाळा असेल तर त्याचा हिस्सा होऊ नये. तसेंच गाई चारण्या बद्दल धर्मार्थ जमीन सोडली असेल तर त्याचा विभाग करूं नये. विशेष समजूत. (1) विभक्त झालेल्या मनुष्याने आपल्या बहिणीच्या पुत्रास देवीची पूजा करण्याची व ततसं बंधी नेमणुकीचा हिस्सा घेण्याचा आपला हक लावून दिला असेल त्याजवर त्याचे वारसात हक रहात नाही. इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा..६ पृ. २९८.. मयसपक्ति ।। योगक्षेमशब्देनमंत्रिपुरोहितादयउच्यतेइतिकल्पतरौपचारौगृहारामादिमार्गः ॥ अविभाज्यतितेमोक्तेशयनासनमेव चाते ॥ ४२ ॥ - मंत्री, पुरोहितपणा, व शेतास, । बागास, पाण्यास, देवालयास, घरास जाण्याचे रस्ते इत्यादिकांचा विभाग पृथक् न करितां सर्व दायादांनी समाईक वहिवाट करावी. आसन ह्मणजे ज्या सिंहासनावर बसोन जो राज्य करितो त्या सिंहासनाचा विभाग होऊ नये. श्लोक ॥ याज्ञवल्क्यः ।। सामान्यार्थसमुत्थानविभागस्तुसमस्मृतः।। ४३ ॥ - अविभक्त बंधूतून कोणी एकाने जरी समाईक धनांतून सावकारी वगैरे करून धन वाढविले तरी सांस समान विभाग मिळावा. संपादन करणारास अधिक श मिळू नये. 1174