पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्मशास्त्र च कोणत्याही गोष्टीचा उपयोग केला नाही असे त्याने दाखविले पाहिजे. इं. लॉ.रि. . सी. व्हा. ८ पृ. १५2. श्लोक ।। याज्ञ० ॥ क्रमादभ्यागतंद्रव्यंहतमभ्युद्धरेत्तुयःदायादे भ्योनतद्दद्यात् ॥ २८ ॥ १. परंपरागत द्रव्य, (सरकारांत राहिले अथवा जप्त झाले किंवा दुस-यांनी हरण केलें ) पिता इत्यादिकांस सामर्थ्य नसल्यामुळे हस्तगत झाले नसेल तें द्रव्य पुत्रांतून कोणी एकाने इतर बंधूंची आज्ञा घेऊन किंवा न घेऊन आईबापाच्या द्रव्याचा व्यय न करितां हस्तगत करून घेईल तर त्याणे त्याचा विभाग इतर वारसांस न देतां संपादन करणारानेच व्यावा. लाल २. परंतु वरील रकमेत लिहिलेले द्रव्य जर स्थावर असेल तर हस्तगत करून घेणारा ने त्या एकंदर स्थावर धनांतून चतुर्थांश संपादन करण्याबद्दल घेऊन बाकी जें राहील ते आपल्या सकट समविभाग करून आपला हिस्सा आपण घेऊन बाकी समावभाग इतर बंधूस द्यावा. - श्लोक ।। याज्ञवल्क्यः ॥ विद्ययालब्धमेवच ॥ २९ ॥ १. आई बापाच्या द्रव्याचा व्यय न होतां वेदाध्ययन किंवा. वेद पढविणे, अथवा वेदार्थ सांगणे यांपासून मिळविलेले जे द्रव्य तें वारसांस देऊ नये. ज्याणे संपादन केले त्याचंच तें सर्व द्रव्य आहे असे समजावें... २. आईबापाचे द्रव्याचा व्यय करून वरील रकमेत सांगितलेले द्रव्य संपादन केले असेल तर मिळविणारास मेहनतीबद्दल काही न देतां दायाप्रमाणे समान विभाग व्हावा. श्लोक ॥ नारदः ॥ कुटुंबविभृयाभद्रातुयॊविद्यामधिगच्छतः भाग दद्याद्धनात्तस्मात्सलभेताश्रुतोपिसन् ॥ ३० ॥ विद्याध्ययन करणाऱ्या भावाचे कुटुंबपोषण जो भाऊ करितो तो विद्याहीन असून त्या दोघांची कबुलायत झाली नसेल तरी विद्याधनाचा विभाग त्या भावास दिला पाहिजे. श्लोक ॥ मनुः ।। अनुपनन्पितद्रव्यंश्रमेणयदुपार्जयेत् ॥ दायादे भ्योनतदद्यात् ।। ३१ ॥ आईबापाचे द्रव्याचा खर्च न करितां स्वकष्टाने ह्मणले सेवा किंवा युद्धादिकेंकरून जे द्रव्य (स्थावर जंगम) संपादन केले असेल त्या धनाचा विभाग आई, बाप, भाऊबंद इत्यादिकांस न देतां स्वतः मिळविणारानेच घ्यावा. श्लोक । कात्यायनः ॥ परभक्तोपयोगेनविद्याप्राप्तान्यत