पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५२] धर्मशास्त्र.. नाग करून घ्यावा, असें कथन केले आहे; परंतु आईस कर्ज असून तिचें स्त्रीधनही असेल त्या प्रसंगी ते स्त्रीधन पुत्रांनी घेऊन ऋणादान प्रकरणांत सांगितल्या रीतीचं कर्ज असेल तर ते आईचे स्वधिनांतून फेडावें. जर स्त्रीधन कमी असून ऋण जास्त असेल तरी ही पुत्राने धन घेऊन कर्ज फेडावें. आईचे स्त्रीधन ऋण फिटून जास्त असेल तर कर्ज फेडन वाकी जे राहील ते. कन्येस ह्मणजे बहिणीस वांटून द्यावे. कन्येस आईचे ऋण फेडण्याचा अधिकार शास्त्रांत सांगितला नाहीं; म्हणून ऋण फिटून जर जास्त उरेल तरच आईचे स्त्रीधन कन्येस घेण्याचा अधिकार पोचतो. इतर प्रसंगी पोचत नाही. विशेष समजूत... (१) एखाया मयत खोस लग्नाच्या वेळेस मिळालेले दागिने खीधन असतील ते तिच्या कन्येस नि ळतील. आणि लग्नानंतर नवयाने किंवा नातेवाईकाने दिले असतील ते दागिने मयुस शाखा न्वयें पत्रास व कन्येस सारखे निशाने मिळतील.ई. लॉ.री. म. सी. व्हा. ९ पृ. ११५. (२) ज्या ठिकाणी मिताक्षरा ग्रंथ मानतात त्या ठिकाणी मुलीस वारसाचे हक्काने बापाची मिळकत मिळाली असेल ती, तिचें खीधन आहे. ती मिळकत तिचे मरणानंतर तिच मलाकडे न जाता मलीस मिळाली पाहिजे. इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ११ पृ. ६१२. श्लो०॥ स्मतिः ॥ पुमान्पुंसोधिकेशुक्रेसीभवत्यधिकेस्त्रियः ॥२४॥ मातृधन पुत्राकडे न जातां कन्येकडेसच जावे, तसेच पित्याचे धन कन्येकडेस न जातां पुत्राकडेसच जावे याचे कारण काय याजबद्दल शंका घेऊन निवारण करितों. 6 पुरुषाचे वीर्य अधिक असल्यास पुत्र होतो, आणि स्त्रीचे शुक्र अधिक असल्यास कन्या होते. यास्तव कन्येचे ठायीं स्त्रीचे अवयव अधिक असतात ह्मणून स्त्रीधन कन्येकडे जाते. व पुत्राचे ठायीं पित्याचे अवयव अधिक आहेत ह्मणोन पित्याचें धन पुत्राकडे जाते, असा सिद्धांत आहे. श्ला०॥ गीतमः ।। स्त्रोधनंदाहेतणांअप्रत्तानांअप्रतिष्ठितानांचेति ॥२६ स्त्रीधन कोणत्या प्रसंगी कोणत्या कन्येस कसे द्यावे याजबद्दल उपपादन करितों. एक कन्या विवाहित, दुसरी अविवाहित, तिसरी विवाहित निर्धन, चौथी विवाहित अशा चौघी असतील त्या प्रसंगी मुख्यत्वे करून ज्या आविवाहित कन्या अलि त्यांस ते स्त्रीधन' द्यावें. जर ते तसे नसोन विवाहित निर्धन असतील तर त्यांस द्यावे. त्याही नसून विवाहित सधन असतील तर त्यांस द्यावे. चौघी विवाहित, किंवा चौघी अविवाहित, किंवा चौघी विवाहित सधन, किंवा चौघी विवाहित निर्धन अशा असतील तर पूर्वीच्या अनुक्रमाने समान विभाग सर्व कन्यांस द्यावे.