पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दायविभाग प्रकरण. [४९ । बापाच्या व आजाच्या धनाचा हिस्सा घेण्याची इच्छा त्यांस कधी नव्हावी, असा एक विभाग करण्याचा प्रकार सांगितला आहे. . श्लोक ॥ या० ॥ विभजेरन्सुताःपित्रोरूध्वंरिक्थंऋणंसमम् ॥ २२ ॥ आई बाप जिवंत असतां कोण कोणत्या रीतीने विभाग व्हावा याजबद्दल पूर्वी उपपादन केले आहे. आतां आई बाप निवर्तल्यावर परंपरागत व पितृसंपादित द्रव्य, तसेच मातृस्त्रीधन असे अनेक प्रकारचे धन असल्यास त्याचा विभाग केव्हां व कोणी कसा करावा या विषयी स्पष्टीकरण करितो:_आई बाप निवर्तल्या नंतर पुत्रांनी आईच्या स्त्रीधना वांचून बाकी सर्व धनाचा विषम विभाग करावा असें आपस्तंबांदिकांचे मत आहे म्हणून मनूने सांगोन पुनः ( मनुःपुत्रेभ्योदायव्यभजत् ) मनूनेंच विषम विभागाचा निषेध करून समच विभाग व्हावा अशा विषयी कारणे दाखविली ती ( अस्वयंलोकविहिष्टधर्ममप्याचरेनतु ॥ महोक्षवामहाजंवाश्रोत्रियायोपकल्पयदिति ॥ तथा अनूबंध्यामालभतइत्यादिगवालंभनविधानलोकविद्दिष्टत्वादननुष्ठानंतथायोगधर्मोद्धारविभागों पिनैवकलौसंप्रवर्ततहात ॥) अनुक्रमाने सांगतो: १. धर्म असून जो लोकविरुद्ध व त्या पासून स्वर्गप्राप्तीही नाही, असे जे अनेक धर्म त्यांत नियोग धर्म म्हणजे ज्येष्ठ भावाची स्त्री निपुत्रिक असून तिचा पति मृत असेल तर मृताच्या कनिष्ठ बंधू पासून प्रजोत्पत्ति करून घ्यावी. तसेच अनुचंध्या (ह्मणजे कोणी महासत्पुरुष किंवा अतिथि घरी आला असता त्यांच्या भोजनाकरितां गोवध करावा.) श्रोत्रिय झणजे वेदशास्त्र संपन्न असून श्रौतस्मात कर्म करणारा घरी आला असता त्यांजकरितां माठा बलाढ्य बैल, किंवा बोकड त्यांस अर्पण करावा. असें स्मृतीने अनेक प्रकारचे धर्म सांगितले असून ते लोकरूढीस विरुद्ध आणि कली मध्ये निंद्य ह्मणोन इतर शास्त्रांतही सांगितले आहे. त्याचप्रमाणे विषम व उद्धार विभागही कली मध्ये वर्ज केला आहे. याजकरितां विषम विभाग न होतां पुत्रांनी समविभाग करावा हे योग्य आहे. २ वरील रकमेत समविभाग करण्याविषयी उपपादन केले आहे. परंतु आईबाप हे जिवंत असते समयीं धर्म कार्य व उपजीविका व विपत्ति निवारण करण्याकरितां जें कर्ज झाले असेल तें आईबाप हे न फेडतां मृत होतील तर ज्या वेळेस विभाग करण्याची संधी आली असेल त्या प्रसंगी पत्रांना आईबापाचे कर्ज व धन हीं। दोन्ही समसमान वांटून घ्यावी. विशेष समजत. 13) वादी याने पूर्वी वाटणी पत्राचेआधारें दावा केला. तें बांटणीपत्र अव्यवहारोपयोगी ठरल्यावरू न सर्वसाधारण चांटणी करुन घेण्याचा दुसरा दावा केला असतां चालतो. ई. लॉ. रि. में. सी. व्हा. ५ पृ. ५८९.