पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्येष्ठ पुत्रास श्रेष्ठ भाग, मध्यम पुत्रास मध्यम भाग, कनिष्ठ पुत्रास कनिष्ठ भाम, अशा अनुक्रमाने किंवा सर्वास सारखेही भाग करून द्यावे. ज्येष्ट पुत्रास श्रेष्ठ भाग अर्से अनुक्रमाने विभाग देण्याविषयों सांगितले आहे. तर श्रेष्ठ भाग म्हणजे काय व किती प्रकारचा आहे याचे निराकरण करितो. श्लोक ॥ मनुः ॥ ज्येष्ठस्यविशउद्धारःसर्वद्रव्याचयद्वरम्ततोधैं मध्यमस्यस्यातुरीयंतयवीयसः ॥ १७ ॥ १. समाईक द्रव्यांतून विसावा अंश म्हणजे शेकडा ५ रुपये प्रमाणे देणे किंवा समाईक द्रव्यांतून जी मौल्यवान वस्तु असेल ती देणे असे दोन प्रकारचे ज्यष्ठ भाग आहेत. व याच भागास उत्धारांशही ह्मणतात असे समजावें... २. मध्यमास मध्यम भाग, ह्मणजे शेकडा अडीच रुपये तसेच कनिष्ठास कनिष्ट भाग ह्मणजे शेकडा सवा रुपया अशा अनुक्रमाने जितके पुत्र असतील तितक्यांस विभाग करून द्यावे. ३. हा जो विषम विभाग सांगितला आहे. तो स्वसंपादित द्रव्याविषयी जाणाचा. आतां परंपरागत द्रव्य असेल तर त्याजवर पिता पुत्राची मालकी समान आह ह्मणोन बापाच्या इच्छेनें विषम विभाग होणार नाहीत. .. ग्रंथकार.-वरील रकमेंत पिता जिवंत असतां स्वसंपादित धनाचा विभाग मनूनें सांगितल्या प्रमाणे स्वइच्छेने करण्याचा प्रकार सांगितला आहे; परंतु बापाची इच्छा विभाग करण्याविषयी नसून पुत्राचेच इच्छेनें वडिलोपाजत व पित्याने स्वतःसंपादिलेले अशा दोनी धनांचा विभाग होणे तर कोण कोणत्या समयी कोणकोणत्या रीतीने व्हावा याविषयी विचार. का श्लोक ॥ नारदः ॥ अतऊर्ध्वपितुःपुत्रा विभजेयुधनसमम् ॥ मातुनिवृत्तेरजसिपत्तासुभागनीपुच ॥ निवृत्तेचापिरमणेपितुर्युपरतस्पृ हे ॥ पितुरधर्मवार्तनिदीर्घरागिणचेति ॥ १८ ॥ १. पिता जिवंत असतां त्यास प्रजोत्पत्ति होण्याची राहिली अगर पिता उपरत ह्मणजे प्रपंच करण्याची इच्छा नसोन विरक्त झाला असेल, बहिणीचे लग्न झाले असेल, किवा पिता अधर्मवृत्ति असेल, अगर महारोगग्रस्त झाला असेल, तसेंच माता अस्पर्श होण्याची राहिली असेल, किंवा अशाच प्रकारची अनक कारणे सयुक्तिक असतील तर पित्याचे इच्छेवांचून पुत्राचेच इच्छेने समान विभाग व्हावा अस आह. २. सदरहू विभागाचे काल पिता जिवंत असत सांगितले परतु पिता मृत होईल तर पुत्रांनी आपल्या इच्छेने बापाचे व आज्याचे धन समान वाटून घ्यावे, हा एक काल आह