पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रमाणे मानण्याची चाल असल्या कारणाने जनरूढि किंवा ज्या जातीत जी चाल असेल त्याप्रमाणे वागावे असेंही शास्त्रांत अनेक ठिकाणी सांगितले आहे. म्हणून ब्राह्मणादि चारी वर्णांत दत्तक, औरस या पुत्रास कायम ठेवून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वर्णां खरीज इतर जे. शुद्रादिक यामध्ये पौनर्भवासहवर्तमान तीन पुत्रही शास्त्र व जनरूढीने कायम केले आहेत. या करितां यात्रिवर्गीस कोण कोणत्या रीतीने विभाग मिळावा हे अनुक्रमाने सांगतो:श्लोक ॥ याज्ञवल्क्यः ॥ अधुनावय॑तेदायविभागोयोगमुर्तिना ॥६॥ दाय विभाग मणजे काय? ज्या धनावर ज्या मनुष्यांची मालकी ज्याप्रमाणे असते त्याच प्रमाणे वारस नात्याने दुसऱ्या मनुष्याची मालकी ज्या धनावर पोंचते त्या धनास दाय असें ह्मपोन. त्या धनाचा विभाग होणे. त्यास दायविभाग असें ह्मणावें. पंक्ति ॥ विज्ञानेश्वर ॥ सचद्विविधःसप्रतिबंधोअप्रतिबंधश्चेतितत्र; पुत्राणांपौत्राणांचपुत्रत्वेनपौत्रत्वेनचपितृधनंपैतामहधनंपितृभ्रात्रादिनांतुपुत्राभावेखाम्यभावेचखंभवतीतिपुत्रसद्भावः खामिसभ्दावश्चप्रतिबंधकः ॥ ७॥ दाय किती प्रकारचे आहेत? अप्रतिबंधक व सप्रतिबंध असे दोन प्रकारचे दाय असून त्यांत अप्रतिबंधदाय म्हणजे लेकाच्या नात्याने. बापाच्या धनावर व नातवाच्या नात्याने आजाचे धनावर जी मालकी पोचते त्या धनास अप्रतिबंधदाय असे ह्मणावें. व सप्रतिबंधदाय म्हणजे चुलता, भाऊ, त्याचे पुत्र, व नातु वगैरे जे. वंशज असतील ते आपआपले धनास मालक आहेत, म्हणून चुलत्याचे धनावर पुतण्याची मालकी. त्याचे पुत्रप्रपौत्रादिक असतील तोपर्यंत पोचत नाही. तसेच भाऊ किंवा, त्यांचे पुत्रपौत्र इत्यादिक जिवंत आहेत तो पर्यंत एका भावाची मालकी दुसऱ्या भावाच्या धनावर पोंचत नाही. कारण हे जो पावेतों जिवंत आहेत तो पावेतों ज्याचें धन असेल त्याचीच मालकी त्यावर आहे. अर्थात चुलता व भाऊ जिवंत असणे हा एक प्रतिबंध, तसेच त्याचे पुत्र पौत्रादिक असतील तर तो एक प्रतिबंध, असे अनेक प्रतिबंध आहेत म्हणून त्या धनास सप्रतिबंधदाय असे म्हणावे. पंक्ति ॥ विज्ञानेश्व० ॥ किंविभागात्स्वत्वमुत्पद्यतेउतस्वसतो वि भागइति ॥८॥ वरील कलमांत सप्रतिबंध व अप्रतिबंध दायांबद्दल. उपपादन कले. आता दायाचा विभाग करण्यापूर्वी दायांवर स्वत्व कोणत्या रीतीने उत्पन्न होते, व बापाच्या पाटी लेकानें जन्म घेतल्यानेच बापाच्या जिनगीवर लेकाची मालकी उत्पन्न