पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३. श्लोक या. ॥ गृहेप्रच्छिन्नउत्पन्नोगूढजस्क्तसुतस्मृतः ॥ गुढज म्हणजे आपल्या स्त्रीस आपल्यास न कळतां सजातीय्य पुरुषापासून पल्या घरी उत्पन्न झालेला पुत्र. ४. श्लोक या.॥ कानीनःकन्यकाजात मातामहसुतोमतः ॥ कानीन ह्मणजे कन्यावस्थेत लग्न होण्या पूर्वी जीस सजातीय पुरुषा पासून उत्पन्न होतो तो त्यास मातामहसुत असेही म्हणतात. ५. श्लोक याज्ञ. ॥ अक्षतायांक्षतायांवाजातःपौनर्भवस्तथा ॥ पौनर्भव ह्मणजे कोणत्याही एका स्त्रीचे लग्न प्रथमतः झाल्या नंतर काही कारणाने आईबापांनी तिजला दुसऱ्यास लग्न किंवा पाट लावून दिल्या नंतर त्या स्त्रीस नाहाण आल्यापूर्वी किंवा पश्चात जो पुत्र पाटाच्या नवऱ्या पासून होतो तो. ६. श्लोक || याज्ञव०॥ दद्यान्मातापितावायंसपुत्रोदत्तकोभवेत्॥ दत्तक आईबाप ज्या पुत्रास प्रीतीने उदकदानपूर्वक सजातीय निपुत्रिक पुरुपास जो पुत्र देतात तो. ७. श्लोक ॥ याश्यवल्क्यः ॥ क्रीतस्तताभ्यांविक्रीतः ।। क्रीत म्हणजे ज्या पुत्रास आईबाप विकत देतात तो. ८. श्लोक या. ॥ ऋत्रिम स्यात्स्वयंकृतः ॥ कृत्रिम म्हणजे कोणीही धनाचा लोभ दाखवून ज्या मुलास आपल्या मुलाप्रमाणे बाळगतात तो. ९ श्लोक या.॥ दत्तात्मातुस्वयंदत्तः ॥ स्वयंदत्त म्हणजे जो आपणच होऊन मी तुमचा मुलगा होतो; म्हणोन घरांत जो राहतो तो. १० श्लोक या.।। गर्भविन्नःसहोढजः ।। सहोढज म्हणजे जी कन्या गरोदर असतां तिचेशी लग्न लाविल्या नंतर तिला जो पुत्र होतो तो. ११ श्लोक । याज्ञवल्क्यः ॥ उत्सृष्टोगृत्द्यतेयस्क्तसोपविद्धोभवेत्मतः ॥ अपविद्ध ज्या पुत्रास आईबापांनी सोडून दिल्या कारणाने चुकारू सांपडतो तो. या प्रमाणे औरस अनौरस पुत्र आपापल्या आई, बाप, भाऊ इत्यादिकांचे दाय घे. णारे हातात असे सांगितले आहे. श्लोक ॥ स्मृतिः ॥ दत्तौरसेतरेषांतुपुत्रत्वेनपरिग्रहइतिकलिवर्जे पाठादितिउक्तपिशूद्रजातोपोनर्भवस्यापिग्रहणसंभवा ॥ दत्तौरससमत्वंपौनर्भवस्यापिसंभवति ॥५॥ दत्तक आणि औरस या दोन पुत्रां खेरीज इतर पुत्रांस कली मध्ये निषेधिले आहे, म्हणून त्यांस पुत्रा प्रमाणे मानूं नये, असें ह्या स्मतिकाराने सांगितले आहे परंतु निषिद्ध पुत्रांपैकी पौनर्भव म्हणजे पाटाच्या स्त्रीच्या मुलास शुद्रजाती मध्ये पुत्रा