पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्मशास्त्रे दायविभाग प्रकरण प्रारंभः या प्रसंगी दायाच्या विभागाचा प्रकार सांगणे आहे या करितां दाय ह्मणजे हिस्सा या प्रत घेणारे कोण कोण आहेत हे समजल्या वांचून दायाचा विभाग प्रथ- मतः सांगण्यास अडचण आहे, एतदर्थ पुत्राविषयी विचार सांगतों. विज्ञानेश्वरपंक्ति ॥ औरसानौरसभेदेनद्विविधःपुत्रः ॥१॥ औरस अनौरस अशा प्रकारचे पुत्र दोघे आहेत त्यांत औरस पुत्र झणजे काय हैं प्रथमतःसांगतो. श्लोक याज्ञ०॥ औरसोधर्मपत्नीज उरसाजात औरसः ॥२॥ औरस झणजे आपल्याशी लग्न झालेल्या सजातीय स्त्रीस आपल्यापासून झालेला पुत्र, अनौरस ह्मणजे आपल्याशी लग्न झालेल्या स्त्रीस परपुरुषापासून झालेला, अगर आपल्याशी लग्न न होतां ज्या स्त्रीस इतर सजातीय पुरुषांशी लग्न लागले असोन तिला तिच्या नवऱ्या पासून झालेल्या पुत्रावर आपली मालकी कोणत्याही कारणाने पुत्रा प्रमाणे पोचत असेल तो; औरस व अनौरस या उभयतांस मुख्य व गौण पुत्र असेंही उपनाम शास्त्रकाराने दिले आहे. विज्ञानेश्वरपंक्ति॥सजातीय्यविजातीय्यभेदेनऔरस पुत्रोपिद्विविधः॥३॥ औरस पुत्रांत किती भेद आहेत? सजातीय विजातीय असे दोन भेद आहेत; त्यांत सजातीय औरस पुत्र झणजे ज्या जातीचे पुरुष त्याच जातीतील कन्येशी विवाह करून तिजला आपल्यापासून झालेला जो पुत्र तो. विज्ञानेश्वरपंक्ति ॥ विभिन्नजातीयस्त्रीपुरुषयोर्विवाहानंतरंतयो र्जातोयःपुत्रःसविजातीय्यौरसः ॥ ४ ॥ विजातीय औरस पुत्र म्हणजे पुरुषाची एक जात, व त्याहून स्त्रीची भिन्न जा. त असून उभयतांशी लग्न लागल्या नंतर त्या स्त्रीस त्या नवऱ्यापासून झालेला जो पुत्र तो. अनौरस पुत्र किती आहेत? १. श्लाक या. ॥ तत्समापुत्रिकासुतः ॥ पुत्रिका सुत म्हणजे आपल्या मुलीचा मुलगा, हा औरस पुत्रा प्रमाणेच सर्वांविषयी मालक समजावा. २. श्लोक या. ॥ क्षेत्रजाक्षेत्रजातस्तु ॥ क्षेत्रज म्हणजे आपल्या विवाहित स्त्रीस सजातीय गोत्र किंवा परगोत्र परपुरुषापासून झालेला पुत्र,