पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घमशास्त्र ११. शरणागतापुत्र म्हणजे आपल्यास जी शरण आलेली तिचा मुलगा. अशा प्रकारचे पुत्र दत्तक घेऊ नये, असे समजावे. विशेष समजूत. अविवाहित मनुण्याने केलेलें दत्तविधान व्यावहारोपयोगी होत नाही. इ. लॉ. रि. मुं. ति. व्हो, १२ पृ. ३२९. ग्रंथकार. ब्रह्मचारी व सन्यासी या उभयतांनी दत्तक घ्यावा किंवा नाही? याजबद्दल पुत्र होण्याचा संभव असून कोणी मनुष्य निपुत्रिक किंवा मृतपुत्रक असेल तर त्यांणी दत्तक घ्यावा असे मागें सांगितले आहे. याजकरितां ब्रम्हचारी याची गणना लग्न होई तो पर्यंत निपुत्रिकांत होत नाही म्हणून त्याणे दचक घेऊ नये. तसेंच सन्यासी याची गणना निपुत्रिकांत होत नाही कारण सन्यास घेते वेळेसच (काम्याणांकर्मणान्यासंसन्यासकवयोविदुः ॥ इतिभग० गीतोक्तेः॥ सर्व काम्य कर्म व अधिक अमुष्मिक कर्माचा त्याग करून केवळ मुक्तीच मिळावी अशा हेतूने आश्रम घेतला असून त्याणे अरण्यांत राहून उपजीविके करितां सिद्धान्न भिक्षा मात्र मागावी. या खेरीज त्याने दानादिकें करून द्रव्य वगैरे संपादन कसू नये, असे सन्यास धर्मात सांगितले आहे; त्या प्रमाणे जो वागणुक करितो तो उत्तम गतीस जातो. अशा प्रसंगों पुत्रांनी पारलौकिक क्रिया केल्यानेच उत्तम गतीस जातो असें नाही. म्हणोन संन्याशास जो नियम सांगितला आहे त्या नियमाचें उल्लंघन करून दचक म्हणून एखादा पुत्र घेईल तर तो आपल्या धर्मांतून भ्रष्ट ही किंबहूना झाल्याप्रमाणे होईल ; याजकरितां संन्याशानी दचक घऊ नये, दानादिकं करून द्रव्य संपादन करूं नये, असे शास्त्रांत सांगितले आहे; परंतु गुरु अथवा आचार्य अशा स्थानी मानून कोणी कोणत्याही रीतीने धन अर्पण केलें असेल तर तें धन शिष्यांनी घ्यावे, असें दायविभागांत सांगितले आहे, अर्थातच दत्तक घेऊनये. श्लोक ॥ शौनकः ॥ वंध्यावामृतपुत्रावेत्यत्रपुत्रपदंपुत्रपौत्रप्रपौ त्रयोरुपलक्षणं ॥ २० ॥ 'ज्यास मुलगा किंवा नातू किंवा पणतू या तिघांपैकी कोणहिी असल्यास ते निपुत्रिक होत नाहीत, ह्मणोन या वचनाचा अर्थ आहे. याजकरितां मुनेने दत्तक घेतला असेल तर सासूने दत्तक घेऊ नये, हे उघडच आहे; परंतु पूर्वी सासूनें दत्तक घेतला असेल तरी सुनेने दत्तक घेण्याविषयी प्रतिबंध नाही. कारण सासूनें जो पुत्र दत्तक घेतला त्याचा समावेश सुनेच्या पुत्राच्या ठिकाणी होत नसून सूनही निपुत्रिक राहते ह्मणोन सुनेने दत्तक घेतला असतां सुनेच्या दत्तकपुत्राचा व सासूच्या दत्तकपुत्राचा वारसा चुलता व पुतण्या याप्रमाणे होईल असे समजावें,