पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रापानपारा (१) नाह्मण जातींत बहिणीचा मुलगा दत्तक घेऊनये असे आधार या कज्यात दाखविले आहेत. पहा:-ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. 3 पृ. २७३ व (२) ई. लॉ. रि. अ. सी व्हा. ८ पृ. १ आणि (3) ई. लॉ.रि. अ. सी. व्हा. १२ पृ. ५१. (१) बायकोच्या भावाचा मुलगा दत्तक घेण्याचा अधिकार आहे. इं. लॉ, रि. म- सी. व्हा. ३ पृ. १५ सदरहू वहिवाट मुंबई इलाख्यांत चालू नाही. नारदः ॥ आचार्यमित्रभगिनीसरिवशिष्यपुत्रःप्रावाजिक श्वशुरजश्चसगोत्रजश्च ॥ साध्वाय्यधान्युत्तमवर्णजश्चतथैवपुत्रःशरणांगतायाः ॥ १॥ आचार्यपुत्रमारभ्यशरणागतपुत्रकाः ॥ विरुद्ध बंधसंबंधात्तिकत्वेतुवर्जिताः ॥ १९ ॥ गया स्त्रीशी व्यवहार झाला असतां मातेशी गमन केल्या सारखे होते, याविषयी विज्ञानेश्वर ग्रंथकार यांणी स्त्रीसंग्रहण प्रकरणांत विस्तार केला आहे. आतां या दत्तक प्रकरणांत दचक होणाऱ्याची मातोश्री दचक होणार याची बायको किबहना लग्न झाले असते तर होती अशा नात्याचा समावेश होणारी ( भावजय ) असली पाहिजे, ह्मणोन लिहिले आहे, तेव्हां दत्तक घेणे तो खाली जे पुत्र दर्शविले आहेत, तशा पुत्रांस घेऊ नये. कारण जर दत्तक घेतला असता त्या पुत्राच्या आईच्या ठिकाणी दत्तक घेणाऱ्याच्या बायकोचा समावेश होतो. अर्थात त्या पुत्रास दशक घेतले असतां दत्तक घेणारा मात्र गमन करण्यास प्रवृच झाल्याचा दोषी होतो. तसेंच जो दोषी झाला त्यास कोणतेही कर्म करण्याचा अधिकार नाही. व विरुद्ध बंधुसंबंधा मुळे स्था पुत्रास दत्तकही घेऊ नये, असे होते. याज करितां ते पुत्र कोण कोणते ते खाली दर्शवितों: १. आचार्यपुत्र ह्मणजे आपल्यास मंत्रादिक उपदेश करणारा जो गुरु त्या चा पुत्र. २. मित्रपुत्र ह्मणजे स्नेही याचा मुलगा. ३. भगिनिसखी पुत्र रणजे. बहिणीच्या मैत्रिणीचा मुलगा. ४. सच्छिष्य पुत्र ह्मणजे आपल्या पाशी मंत्रोपदेश घेतलेल्याचा मुलगा. ५. प्रावाजिक म्हणजे संन्याशा प्रमाणे वागणारीचा मुलगा. ६. श्वशुरज म्हणजे सासूचा मुलगा म्हणजे मेहुणा. ७. सगोत्रज म्हणजे आपल्या गोत्रांत उत्पन्न झालेली जी तिचा मुलगा. ८. साध्वीय म्हणजे पातिव्रत्याने वागणारीचा मुलगा. ९. धात्रिय म्हणजे आपले दाईचा मुलगा. १०. उत्तम वर्णज म्हणजे आपल्याहून जे श्रेष्ठ त्या जातीतील मुलगा