पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दत्तक नकार श्लोक ॥ शौनकः ।। सर्वेषामेववर्णानांज्ञातिष्वेवनचान्यतः ॥ १४ ॥ वरील साहावे, सातवे, आठवे, नववे, कलमांत दत्तक घेण्याचा प्रकार सांगितला आहे तो ज्याची ज्ञात व जात व वर्ण ज्याप्रमाणे असेल तशांचा ( त्यांतील आपली ज्ञाति ह्मणजे शरीरसंबंध ज्याशी होण्याचा संभव आहे ) मुलगा दत्तक घ्यावा असे सांगितले आहे, ह्मणून कोकणस्थांनी देशस्थांचा व देशस्थांनी श्री वैष्णवांचा अशा प्रमाणे ज्यांचा शरीरसंबंध होत नाही त्याणी एकमेकांचा दत्तक घेऊ नये; असा निबंध स्मृतिकारांनी केला असून याप्रमाणेच दत्तकौस्तुभ व दत्तमीमांसा इत्यादि ग्रंथकारांचेही मत असून त्याणी (व्याख्याही अशीच केली आहे. पंक्ति ॥ दत्तमीमांसा ॥ अपुत्रेणसुतःकार्य यादृक्ताहकप्रयत्नतःइति ॥ अत्रपुत्रपदंपौत्रप्रपौत्रयोरुपलक्षणां ॥ तस्मात्पुत्रपौत्रप्रपौत्राम्यस्ययासांवाअन्यतराःसंतितैःदत्तपुत्रोनग्रात्यः ॥१५॥ ... कोणी कोणकोणते दत्तक पुत्र घेऊं नये याचा विचार. ज्या पुरुषास किंवा स्त्रीस पुत्र, पौत्र, किंवा प्रपौत्र नसतील त्याणी जवळचा सपिंड सगोत्र संख्या भावाचा पुत्र दत्तक मिळत असेल तर इतर पुत्र घेऊ नये; कारण एका बापापासून एका आईचे पोटी झालेले सहोदर बंधू यांपैकी, एखाद्यास "पुत्र झाला असतां बाकीचे बंधु सर्वही पुत्रवान होतात असें मनुस्मृतिकाराने सांगितले असून या प्रकरणाचे सातवे कलमांत ज्या प्रसंगी दत्तक घेण्याची संधि आ. त्या प्रसंगी भावाचा पुत्र दत्तक घेण्यास योग्य असतां भिन्न मात्रक किंवा भिन्न इपितृक यांचे पुत्र दत्तक घेऊ नये. दत्तमीमांसा ॥ भ्रातृणामितिपुंस्त्वनिर्देशात्सोदराणांभ्रातृभागेनीनामपिपरस्परंपुत्रगृहीतृत्वाभावोवगम्यते ॥ वृद्धगौतमः ॥ ब्राम्हणादित्रयेनास्तिभागिनेयःसुतःकचिन्दागिनेयपदंभ्रातपत्रस्याप्युपलक्षणम् ॥ स्त्रीपुंस्त्वजातिभेदादित्यलंविस्तरेण ॥ १६ ॥ आपआपल्या भावांस परस्परांनी दत्तक घेऊ नये. तसेंच आईबापाचे पोटी जन्मा घेतलेली बहीणभावंडे यांणी परस्परें भावाचा मुलगा बहिणीनें व बहिणीचा मुलगा भावाने दत्तक घेऊ नये; परंतु बहिणीचा मुलगा बहिणीने व भावाचा मुलगा भावाने असे परस्परें द्यावे व घ्यावे. कारण एकजात ज्यांची असेल त्यांणी परस्परांत दत्तक घ्यावा म्हणून जे येथे सांगितले आहे तेथे जात या शब्दांत स्त्रीपुरुषांचा समावेश करावा. दत्तमीमांसा ॥ अपुत्रस्यपितृव्यस्यतत्पुत्रोभ्रातृजाभवत्सएवतस्यकुर्वीतश्राद्धपिंडोदकक्रियामिति ॥ ब्रहस्पतिपराशरस्मरणात ॥ १७॥