पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

र्वी सांगितल्या विधिपूर्वक दत्तक घेऊन पुत्रष्ठि व चौल उपनाम सिताल मत्रान करावे म्हणजे तो दत्तक यथाशास्त्र होऊन आपल्या गोत्रात यता. पांच वर्षांहून अधिक वयाचा दत्तक घेतल्यास तो सशास्त्र होणार नाही. असें विज्ञानेश्वर व मयख व वीरमित्रोदय इत्यादिक ग्रंथांत सांगितले आहे.. दत्तकौस्तुभेवसिष्ठः ॥ अन्यशाखोद्भवोदत्तःपुत्रश्चवोपनायित्तः ॥ स्वगोलेणखत्योक्तविधिनागोत्रतामियात् ॥ स्वशाखाभाग० ॥१२॥ - दत्तकौस्तुभकार यांणी मौंजीबंधन झाल्यावरही असगोत्री दत्तक घ्यावा असेंसांगितले आहे; परंतु त्या ग्रंथावर भरवसा ठेवण्याजोगा नाही. कारण एकदेशी मत असून त्याजवरून बहुत ग्रंथांस विरोध येतो. म्हणून तसे करणे युक्तः नाही. - विशेष समजूत. (१) भावाचे संमतीने परगोत्रांतील लग्न जाहलेला मुलगा दत्तक घेतला व त्या दत्तक मुलाने याप मयत जाहल्यावर त्याचें क्रियाकमीतर केलें तें मयताचे भावाने मान्य केले होते तर त्यास दत्तविधानाचे कायदेशीरपणाविषयी हरकत करण्याचा प्रतिबंध आहे. मुं. हा. को. 'रि. व्हा.११ पृ. १९०. ) एखादा ब्राह्मण असगोत्र असून त्याचे लग्र जाहलेले असले तरी मुंबई इलाख्यांत धर्म शाखावरून त्याचे दत्तविधान होण्यास प्रतिबंध येत नाही. इं. लॉ. रि. मुं. सि. व्हा१० पृ. ८०. पंक्ति ॥ दत्तमिमांसायांचपरंमयुखे ॥ सगोत्रदत्तकस्यनायंनियम इतिपरिणीतउत्पन्नपुत्रोोपेदत्तकोभवति ॥ इतिभावः ॥ १३ ॥ सगोत्री दत्तक घणे असल्यास त्याचे वय अमुक असावे असा कांहीं शास्त्रांत स्पष्ट नियम सांगितला नसून सगोत्री पुत्रवानही दत्तक होतो असें कांही ठिकाणी सांगितले आहे, त्याजवरून पाहतां कितीही वर्षीचा सगोत्री मुलगा असेल. तरी त्यास दत्तक घ्यावा असे होते. चारी वर्गातील लोकांनी दत्तक घेणे तो आपआपले जातोंतील घ्यावा असे वरील कलमावरून होते; याजकरितां देशस्थ, कोकणस्थ, व द्रविड, श्रीवैष्णव इत्यादिकांची ब्राह्मणांमध्ये गणना आहे, अर्थात देशस्थांनी कोकणस्थांचा, तसेंच द्रविडांनी श्री वैष्णवांचा दत्तक घेतला असतां हरकत नाही, असे कितीएक लोकांचे संशय आहेत त्यांचे समाधान खालचे कलमावरून होईल. विशेष समजूत. भटियानातील ब्राह्मण लोकांत गोत्रांतील मुलाचे उपनयन झाल्यावर त्याचे दत्तपिधान झा-- लें असतां ते सशाख हालें. ई. लॅॉ. रि.म. सी. व्हा, ९ पृ. ११८.