पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अथ श्रीधर्मशास्त्रे दत्तक प्रकरण प्रारंभः जायमानोवैब्राम्हणस्त्रिभिऋगवाजायतेब्रम्हचर्येणऋषिभ्यः यज्ञेनदेवेभ्यः प्रजयापितृभ्यः ॥ १ ॥ पुत्र व पौत्र झाल्यापासून काय उपयोग आहे याजबद्दल व्याख्या. कोणताही मनुष्य उत्पन्न झाला असतां तो, (देव, ऋषि, पितर) या ति'घांचा ऋाण होतो. त्यांत ब्रह्मचर्याश्रमांत जे व्रत करावे लागतें तें केल्याने ऋषींचे ऋणापासून मुक्त होतो. (E ७2-1 गृहस्थाश्रमांत यज्ञयागादिक कर्मे केल्याने देवाचे ऋणापासून मुक्त होतो. पुत्रसंतति झाल्याने सोम, यमादिक पितरांच्या ऋणापासून मुक्त होतो. पुत्रेणलोकान्जयतिपौत्रेणानंत्ययश्नुते ॥ २ ॥ ज्यास पुत्र झाला तो काही लोकाप्रत ह्मणजे इहलोकाप्रत जिंकून परलोकाप्रत जातो; व पौत्र झाल्याने स्वर्ग ब्रह्मादि लोकाप्रत जाऊन अनेक सुखांप्रत उपभोग करितो. ज्यास पुत्रसंतती असेल ते लोक तिन्हीही ऋणांपासून मुक्त होऊन स्वर्गलोकाप्रत जातात, असे वरील कलमांत सांगितले आहे; याजकरितां सर्वांस पुत्रसंतान असते असा काही नियम नाही. (नापुत्रस्यलोकोस्तीत्याद्यलोकताश्रवणात्क्रियालोपान्मनीषिणइतिमनुवचनाचदत्तपुत्रोग्रात्द्यः ॥) व पुत्र जर नसतील तर ते पितर अधोगतीप्रत जातात. याजकरितां अवरस पुत्राच्या अभावीं पुत्र प्रतिनिधि ( दत्तपुत्र ) विधियुक्त घेतला असतां ते पितर मुक्तीप्रत प्राप्त होतात, असे शास्त्रांत सांगितले आहे, एतदर्थ दत्तकपुत्र अवश्य घेतला पाहिजे. दत्तपुत्र असें कोणास म्हणावें ? मातापितावादद्यातांयमन्दिः पुत्रमापादे ॥ सदृशंगीतिसंयुक्तंसं ज्ञेयोदात्तमः सुतः ॥ ३ ॥ आपत्काल म्हणजे ज्या स्त्रीपुरुषांप्स मुळी संतती नसेल अगर संतती होऊन नष्ट झाली असेल, अथवा संतती असून ती निरुपयोगी म्हणजे बाटलेला, किंवा सरकारी गुन्ह्यांत आल्याने हद्दपार झाला किंवा घटस्फोट झाला असेल, किंवा क्षयादि महारोगग्रस्त झाल्याने पुढे त्याचे लग्न वगैरे होऊन संतती होण्याचा संभव नसेल अशा अनेक रीतीच्या अडचणी ज्यास असतील तशा स्त्रीपुरुषांस आई किंवा बाप अगर उभयतां प्रीतीने आपला सजातीय पुत्र उदकदानपूर्वक ज्यास देतात तो दत्तपुत्र असा समजावा. आपत्कालाशिवाय दत्तक देऊ नये, असें वरील वचनावरून होते, तेव्हां हा