पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केवळ कन्येचीच मालकी. विवाहाचे वेळेस वर, वधू म्हणजे नवरा नवरी हे उभयतां एकासनावर बसली असतां त्या नवऱ्यामुलीस जे धन मिळते त्यास यौतक स्त्रीवन म्हणावे, असे वरील ११ वे कलमांत सांगितले आहे, तसे स्त्रीधन असून त्या स्त्रीस नवरा, भाऊ, दीर, सासरा, मुलगा व मुलगी असे अनेक वारस असतां ती स्त्री मयत होईल, त्या प्रसंगी त्या स्त्रीच्या जितक्या कन्या असतील, त्याच सर्व वारस होतील, बाकीचे कोणी वारप्त होणार नाहीत. श्लोक ॥ गौतमः ॥ स्त्रीधनंदुहितॄणांअमत्तानामप्रतिष्ठितानांचेतिअ प्रतिष्ठिताः निर्धनाः ॥ ३३ ॥ १. अन्वाधेयक स्त्रीधन, आणि भ्रातृप्रीतिदत्त ( नवऱ्याने प्रीतीने दिलेलें । स्त्रीवन वाखेरीज राहिलेले स्त्रीधनाचे प्रकार मागे किंवा पुढे सांगितले असून त्या च्या विभागाविषयी मुद्दाम ठराव केला असेल ते प्रकार खेरीजकरून बाकीचे स्त्रीधन राहिले ते पारिभाषिक स्त्रीधन असें ह्मणावे. त्याचा विभाग कसा व्हावा याजबद्दल व्याख्या. २. पारिभाषिक स्त्रीधन असून ज्या स्त्रीस तें स्त्रीधन मिळाले ती मृत होऊन नवरा पुत्र, दीर इत्यादिक तिचे वारस असून कन्याही आहे तर त्या धनाची मालकी त्या कन्येचीच आहे; इतर वारिसदार यांचा नाही, असे समजावें. ३. वरील रकम २ प्रमाणे, मृतस्त्रीच्या अनेक कन्या असतां त्यांत कांहीं कि वाह झालेल्या असून, त्यांपैकी, कांहीं सधन व कांही निर्धन व कांही अविवाहित असतील, तर त्यांचा विभाग कसा व्हावा याचा खुलासा वरील रकमेवरून होत नाही, एतदर्थ खालच्या रकमेंत स्पष्टीकरण करितो: ४. एका मुलीचे लग्न झालेले असून ती सधन आहे, व दुसरी लग्न झालेली असन निर्धन आहे, व तिसरी अविवाहित अशा अनेक असतील तर त्यांपैकी जिचे लग्न झाले नसेल, तीस ते स्त्रीधन द्यावें; जर तिघीही लग्न झालेल्या असर निर्धन असतील तर त्या सर्वांनी समान वाटून घ्यावे; जर दोघी निर्धन व एक में प्रन अशा असतील तर ज्या निर्धन असतील त्यांस समान वाटून द्यावे; तिघीही सधन असतील तर त्यांसही समान वांटून द्यावे. श्लोक ॥ मनुः ॥ स्त्रियास्तुयद्भवेद्वित्तपित्रादत्तकथंचनब्राह्मणीतहरेकन्यातदपत्यस्यवाभवेत् ॥ ब्राह्मणीकन्यातुसपत्नीमातुराप धनंगण्हाति ॥ ३४ ॥ एका पुरुषास दोघी बायका असून त्या दोघींसही वरील कलमांतील स्त्रीधन मेळाले असता त्या उभयतां स्त्रियांपैकी एकीस कन्या आहेत तर सापत्न व स.