पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असतो मरण पावेल तर ते स्त्रीधन कोणास द्यावें ? व त्यांची व्यवस्था कशी काय करावी ? याजबद्दल विचार. ज्या स्त्रीजवळ अन्वाधेयक स्त्रीधन, आणि प्रीतिदत्त स्त्रीधन, अशी दोनी धने असून ती स्त्री मरण पावेल आणि त्या स्त्रीस नवरा; मुलगा, मुलगी असे अनेक वारस असतील तर ते स्त्रीधन तिच्या संततीने सर्व ध्या नवऱ्याची काही मालकी नाही. श्लोक ॥ मनुः ।। जनन्यांसंस्थितायांतुसमंसवेसहोदरा ॥ भजे रन्मातरिक्थंभागिन्य श्वसनामयः ॥ २८ ॥ वरील कलमांत ज्या स्त्रीचें स्त्रीधन असेल ती स्त्री मरण पावल्यानंतर तिच्या संततीने तें धन घ्यावे, असे लिहिले आहे, त्या प्रसंगी में धन घेणे असेल तें पुरुषसंतती असेल तर त्याणी, व कन्या संतती असल्यास त्यांणी व पत्र, कन्या असे असतीलं तरी त्यांणीही समविभागे वाटून घ्यावे. श्लोक ॥ मनुः । स्त्रीधनस्यादपत्यानांदुहिताचतदशिनी ॥ अ पत्ताचेत्समूटातुलभतेमानमात्रकम् ।। २९ ।। वरील कलमांत समान विभाग वण्याबद्दल सांगितले आहे, परंतु त्यांत पुनः स्पष्टीकरण करून विशेष नियम सांगती. एका स्त्रीस दोन कन्या असून, त्यांत एका कन्येचा विवाह झाला आहे, व एकीचा विवाह होणे आहे, त्या प्रसंगी जिचा विवाह झाला नाही, तिजला मात्र आपले भावाच्या विभागाबरोबर विभाग मिळाला पाहिजे. जिचा विवाह झाला आहे तिजला समभाग न मिळतां काही अंश मात्र द्यावा. श्लोक ॥ कात्यायनः ॥ भगिन्योबांधवैःसाधविभजेरन्सभर्टकाः॥ ३०॥ संशय घेऊन निवृत्ति करणे आहे. एका स्त्रीस दोन कन्या असून, त्यांचा विवाह झाला असेल, त्या प्रसंगी भाऊ आणि बहिणी यांचा विभागे समान करावा. आतां एकीचे मात्र लग्न झाले असेल तर तिजला कमी हिस्सा मिळून लग्न न झालेल्या कन्येस जास्त हिस्सा म्हणजे तिच्या भावाच्या हिश्शा बरोबर मिळावा: श्लोक ॥ मनुः ॥ यास्तासांस्यु हितरस्तासामपियथार्हतः॥ माता मत्यात्धनात्कचित् देयंप्रीतिपूर्वकम् ॥ ३१ ॥ ज्या स्त्रीस दुहित्र मणजे मुलीचा मुलगा असून त्या मयत स्त्रीस मुलगा किंवा मुलगी अशी काही संतती नसेल तर मात्र दोहित्रास त्या मुलांचे आजीच्या स्त्रीधनांतून काही अंश प्रीतीने देऊन बाकी जो शेष राहील तो तिचा नवरा वगैरे वारिसदार जे असतील त्यांणों यथाविभागेंकरून वरील स्त्रीधन वांटून घ्यावे. लोक ॥ मनुः ॥ मातुस्तुयौतकंयत्स्याकुमारीभागएवसः ॥ ३२ ॥