पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इत्यादिकांकडून सव्याज परत देवविले पाहिजे. ते न देतील तर त्यास सरकाराने दंड करावा. श्लोक ॥ नारदः ॥ तदेवयद्यनुज्ञाप्यभक्षयेत्मीतिपूर्वकंमूल्यमेवसदाप्यस्यायदासधनवान्भवेत् ॥ २१॥ जर तें स्त्रीधन त्या स्त्रीच्या अनुमतीनें नवरा, बाप, सासरा, दीर, भाऊ इत्यादिकांनी घेऊन उपभोग घेतला असतां तें धन ज्याप्रमाणे आज्याचे कर्ज बिन व्याजी नातवाने द्यावे असे ऋणादान प्रकरणांत सांगितले आहे त्याचप्रमाणे बिनव्याजी हे धन सदई मनुष्यांनी त्या स्त्रीस परत द्यावें न देतील तर सरकाराने देववावे. ग्रंथकार,--शंका घेऊन निवारण,—सदरील कलमांत व्याजी असे दोन प्रकाराने तें धन स्त्रीस परत द्यावे असे लिहिले आहे; परंतु नवरा, बाप, सासरा, दीर इत्यादिकांनी स्त्रीचे जे द्रव्य घेतले असेल ते परत देण्याची त्यांस काहीच ऐपत नसेल, व जे धन खर्च झाले ते नीतिव्यवहार म्हणजे अन्नआच्छादनाबद्दल झाले असेल तर ते परत देऊ नये; परंतु तें धन देण्याची ऐपत असेल तर वर लिहिलेली सबब लागू नाही, त्यांणी फेड केलीच पाहिजे. श्लोक ॥ मनुः ॥ पत्यौजीवतियत्स्त्रीभिरलंकारोधृतोभवेत् ॥ नतं भजेरन्दायादाभजमानाःपतंतिते ॥ २२ ॥ नवरा जिवंत असून स्त्रीचे अंगावर जे काही सौभाग्याकरितां दागिने घातले असतील ते म्हणजे मुख्यत्वेकरून नथ, बुगड्या, बाल्या, जोडवी, मंगळसूत्र, इत्यादिक सौभाग्यधन असेल त्या धनाचा दायादांनों विभाग करू नये; व कोणी जबरदस्तीनेही घेऊ नय. घेतल्यास दोषी होतील. श्लोक | देवलः ॥ वृत्तिराभरणंशुल्कंलाभश्चस्त्रीधनंभवेत् ॥ भो क्रीचस्वयमेवेदपति हत्यनापदि ॥ २३ ॥ स्त्रीस, वृत्ति म्हणजे उपजीविकेकरितां दिलेलें धन, व आभरण म्हणजे सौमाग्य दागिने, व (शुल्क म्हणजे दागिने धन, दास, दासी, यांच्या मोबदल्यासाठी जे धन मिळाले असेल तें) धन, व लाभ म्हणजे स्त्रीधनाचा व्यापार करून जे व्याज उत्पन्न होईल तें व स्त्रीधन अशी सर्व स्त्रीधनें आपतकालाशिवाय नवऱ्याचे स्वातंत्र्य त्या धनावर नाही. स्त्रीनेच त्याचा उपभोग घ्यावा असे समजले पाहिजे. श्लोक ॥ याज्ञवल्क्यः ॥ दुर्भिक्षेधर्मकायेंचव्याधीसंप्रतिरोधके । गृहीतंस्त्रीधनभर्तानाकामोदातुमर्हति ॥ २४॥