पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दानिक प्रकरण. (११) आर्त मणजे कोणत्याही रोगाने अत्यंत पीडित होऊन त्या धने कांहीं दिले असेल ति. (१२) मत्त म्हणजे कोणताही कैफ येण्याचा पदार्थ खाऊन त्या कैफांत बेशर असतांना दिले असेल तें. C ..2 (१३) उन्मत म्हणजे वेडा व भ्रांतिष्ट इत्यादिकांनी दिले असेल ते. (१४) अपवर्जित म्हणजे माझें कांही एक काम करील या हेतूनें कांहीं दिले असून तो ते काम करीत नसेल त्याबद्दल दिले असेल तें. (१५) अपपात्र म्हणजे कोणी एका मनुष्याने मी ब्राह्मण किंवा वैद्यशास्त्र इत्यादिक जाणणारा आहे अशी भुलथाप देऊन त्याणे कपटाने काही देणगी दसच्या 'पासून घेतली असेल ती. (१६ ) अधर्म संज्ञित ह्मणजे मी धर्मकार्य करणार आहे, असा बहाणा दुसऱ्यापासून काही देणगी घेतली असेल ती. येणे प्रमाणे १६ प्रकारचे धन दिले असेल तरीही ते न दिल्यासारखे आहे ह्मणोन ते परत घ्यावे. मिताक्षरपंक्ति ॥ आर्तदत्तस्यादत्तत्वधर्मकार्यव्यतिरिक्तविषयम।। परंत वरील अकरावे रकमेंत रोग्याविषयी दर्शविले आहे तें जर धर्मकार्या ययी नसेल तर जाणावे. नारदः । गृण्हात्यदत्तयोमोहाद्यश्चादेयप्रयच्छति ॥ अदेयदाप कोदंड्यस्तथादत्तपतीच्छकः ।। ८॥ जी घेण्यास अयोग्य वस्तु असेल ती घेणारा, तसेच देण्यास अयोग्य असेल ती देणारा या उभयतांस राजाने द्रव्याची योग्यता पाहून दंड के सांगितले आहे, याजकरितां कोणत्याही व्यापारामध्ये अयोग्य वस्ता घेणे घडलेले असेल तर ते सर्व परत होऊन राजदंडासही पात्र होतील जावें. उदाहरणे. मिताक्षरपंक्ति ॥ सयंदेयम् ॥ अर्थाद्देवतोद्देशेनयहत्तेतस्मिखत्वा भावाददेयामितितात्पर्यार्थः ॥९॥ इनाम जमिनीचे उत्पन्न देवाकडे खर्च करण्याकरितां कोणे एकास इनाम जमीन दिली असेल त्या जमिनीचे उत्पन्न त्या कामाकडे न लावितां वहिवाट करणारा जर ती जमीन दुसऱ्यास खरेदी किंवा बक्षीस अगर इनाम करून देईल तर ते देणे अ. शास्त्र होईल त्याचा व्यय देवाकडेसच झाला पाहिजे असे समजावे.