पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[१०] धर्मशास्त्र. ६. निक्षेप झणजे कोणी एकानें विश्वास करून ( स्थावरजंगम ) मिळकत ठेव अशी संज्ञा करून आपल्या जवळ ठेवली असेल ती. ६. पुत्र, दारा झणजे आपल्या बायका, पुत्र, पौत्र, प्रपौत्र इत्यादिक. +७. सर्वस्व ह्मणज .घर, दार, चीजवस्त (स्थावरजंगम) मिळकत जी एकंदर असेल ती.. ८. प्रतिश्रत झणजे (धर्मार्थ ) कोणी एकास काही वस्तु देऊ केली असून तीच वस्तु दुसऱ्यास देण्यात येते ती. येणें प्रमाणे आठ प्रकारच्या वस्तु देण्यास अयोग्य ह्मणून सांगितले आहे ते महाविपत्ति व संकटसमय आला असेल तरी खरीद किंवा बक्षीस किंवा दान करण्यास योग्य नाही, कारण सरहूं वस्तूंपैकी अन्वाहित, याचितक, आधि, समाईक, ठेव इत्यादिकांवर देणाराची मालकी नाही सबब कोणासही देऊ नये. स्त्री व पुत्र यांजवर देणाराची मालकी जरी आहे तत्राप देऊं नये. व वंश मणने पुत्र, पौत्र व प्रपौत्र असतील तर एकंदर जिनगी ( स्थावर जंगम घर दार वगैरे ) कोणत्याही रितीने देऊ नये. (पुत्रानुत्पाद्यसंस्कृत्यत्तिंतेषांप्रकल्पयेत्.) कारण पुत्र, पौत्र, प्रपौत्र यांस उत्पन्न करून त्यांची मुंज्य, लग्न इत्यादिक अवश्य कर्तव्य असेल ते संस्कार करून त्याजला वृत्तिसंपादन करून ठेवावी. असें आहे ह्मणून सर्वस्व दान करूं नये. विशेष समजूत. *(१) कोणा एका सोबती हिस्सेदाराला कुटुंबाच्या मिळकतीची स्वत्वनिवृत्ती करण्याचा प्रतिबंध असल्याबद्दल शाखाचा जो नियम आहे तो, आपल्या नातलगास करावयाच्या देणग्यांस किवा परकी मनुष्यास करावयाच्या देणग्यांस एक सारखाच लागू आहे. ई. लॉ. रि. म. सी, व्हा. ९ पृ. २७३. नामदत्त मणजे काय? श्लोक ॥ याज्ञव० ॥ दत्तंच ॥ देयंप्रतिश्रुतचैवदत्वानापहरे पुनः ॥ ४ ॥ जी एखादी वस्तु, किंवा धन कोणास देऊ केले असेल किंवा दिले असेल तें उरत होत नाही, त्याप्त दत्त असें ह्मणतात. श्लोक ॥ नारदः ॥ दत्तंसप्तविधमोक्तं ॥ एण्यमूल्यभृतिस्तुष्ट्यास्नेहात्मत्युपकारतः ।। स्त्रीशुक्लानुगृहाथचदत्तंदानविदोविदुः।।५।। दत्त किती प्रकारचे आहेत ? १. पण्य ह्मणजे विकत घेतलेल्या जिनसांची किंमत,