पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दत्ताप्रदानिकप्रकरणप्रारंभः दत्तापदानिक म्हणजे काय याजबहल व्याख्या. श्लोक ॥ नारदः ॥ दत्वाद्रव्यमसम्यग्यः पुनरादातुमिच्छति ।। दत्ताप्रदानिकंनामव्यवहारपदंहितम् ॥ १॥ दत्ताप्रदानिक म्हणजे देण्यालायक वस्तु असून ती विहित मागोन दिली नसल तर ती परत घेणे, व देण्यालायक वस्तु, असून ती विहित. मार्गाने देऊन परत. न येणे यास दत्ताप्रदानिक असे म्हणतात. याज्ञवल्क्यः ॥ स्वंकुटंबाविरोधेनदेयंदारसुताहते ॥ नान्वयेसतिस. वेस्वंयच्चान्यस्मैप्रतिश्रुतम् ॥ नारदः ॥ अथ देयम् ॥२॥ देण्यास लायक अशा वस्तु कोणत्या? कुटुंब पोषणा निमित्त दरसाल खरचण्यास जे लागतें तें वजा जाऊन बाकी जे आपले स्वामित्व असलेली ( स्थावरजंगममिळकत ) जी असेल ती दान किंवा बक्षिस, अगर खरेदी देण्यास लायक आहे. वृद्धौचमातापितरौसाध्वीभार्यापतिः शिशु ॥ अप्यकार्यशतक त्वाभर्यव्यामनुरब्रवीत् ॥ कारण देणाराने आपले आई बाप व मुले इत्यादिकांचे पोषण कोणत्याही रीतीचे व्यवसाय करून अवश्य करावे असें मनूने सांगितले आहे, याजकरितां तें धन कुटुंबपोषणाहून कमी किंवा समान असेल तर मात्र देऊं नये; परंतु अधिक असल्यास देण्यास हरकत नाही.. देण्यास नालायक असें धन कोणते? नारद: ॥ अन्वाहितंयाचितकमाधिः साधारणंचयत् ॥ नि क्षेपः पुत्रदारांश्चसर्वस्वंचान्वयेसति ॥ ३ ॥ १. अन्वाहित ह्मणजे कोणी एकाने विश्वासें करून वस्तु ( स्थावरजंगम ) कोणी एका जवळ ठेविली असेल ती.. २.याचितक ह्मणजे काही एक वस्तु कोणी एका जवळून ( स्थावर जंगम ) मागून घेतलेली असेल ती.. ३. आधी झणजे मोबदला देऊन काही एक वस्तु ( स्थावर जंगम ) गाहाण ठेवली असेल ती. ..४. साधारण झणजे कांहीं एक वस्तु (स्थावर जंगम ) अमानत असेल ती.