पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[९८] धर्मशास्त्र नाही. वरील १२ वे कलमांत लिहिलेली मनुष्ये सोडून बाकी जी मनुष्य वर सांगितली आहेत त्या सर्वांस ज्यांचे ताब्यात वडिलोपार्जित किंवा स्वतः मिळविलेलें द्रव्य असेल त्यांनी त्या धनांतून अन्नवस्त्र मात्र द्याव. मयुखपंक्ति ॥ व्यभिचारेबहिनिष्कासनमपोषणवा ॥ १३ ॥ अनंशाची व्यभिचारिणी स्त्री असल्यास तिजला अन्नाच्छादन व दायाविभागांव सांगितल्याप्रमाणे हिस्सा व स्त्रीधन या पैकी काहींच न देतां तिजला घरा बाहेर घालवून द्यावें. लोक ॥ या० ॥ औरसास्तेषांनिर्दोषाभागहारिणः ॥ १४ ॥ विशेष नेम. पतित झालेल्याचा मुलगा भ्रष्ट होण्याचे पूर्वी झालेला असेल तर त्यास दायविभागांत सांगितल्या प्रमाणे विभाग मिळेल. श्लो० ॥ या० ॥ सुताश्चैषांप्रभर्तव्याः यावद्वैभर्तुसंस्कृताः ॥१५॥ पतित होण्या पूर्वीच्या मुली असतील तर त्या मुलींचे लग्न होई पर्यंत रक्षण करून बापाचे हिश्शांतून मुलीचे लग्नाबद्दलही खर्च करावा. श्लोक ॥ या० ॥ अपुत्रायोषितश्चैषांभर्तव्याः साधुवृत्तयः ॥२६॥ पतिताची बायको व्यभिचारिणी नसून नीतीने वागणारी असेल तर तीस अन्नाच्छादन देऊन रक्षण करावें. अनंश प्रकरण समास