पान:देशी हुन्नर.pdf/87

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ८१ ]

'तहन शान ' या नांवाचा कुफ्तगारी कामाचा एक प्रकार आहे. त्यांत भांड्यावरील नक्षी खोल खोदून त्यांत सोन्या रुप्याच्या तारा बसवून त्या हातोड्याने ठोकतात व भांडें तापवून पुन्हा ठोकतात. अशा रीतीनें दोन चार वेळ भांडें तापवावे लागतें. या कामाला मेहेनत फार लागते. त्यामुळें मालाची किंमत जास्त वाढून तो सोहलतीनें विकण्यास कठीण जातें. त्यामुळें अलीकडे हलकें काम होऊं लागलें आहे.

 कुराणांतील वाक्यें किंवा एखादा दोहरा अगर प्रदर्शन कमेटीनें आह्मांस बक्षीस द्यावें अशी प्रार्थना इत्यादि लेख सोन्या रुप्याच्या अक्षरांनीं काढण्याची कारागीरांस फार हौस असते.

 पुणे येथील प्रदर्शनांत गुजराथ येथोन कुफ्तगार अहंमद अझीम हा स्वतः आला आहे.

 जयपुरासही अलीकडे कुफ्तगारी काम होऊं लागले आहे. चाकू, कातरी आडकित्ते असल्या किरकोळ जिनसांवर अलवार व लिमडी येथें कुफ्तगारी काम होत असते. दात्या येथेंही असले काम होत असतें.

 ब्रह्मदेशांत काळ्या तांब्यावर किंवा लोखंडावर कधीं कधीं कुफ्तगारी काम करितात. शेकडा पांच भार सोनें आणि थोडा गंधक तांब्यांत घालून तें मिश्रण मुशींत तापविलें ह्मणजे काळें तांबे तयार होतें.

बिदरी काम,

 कुफ्तगारी कामाप्रमाणेंच परंतु त्याजपेक्षां विशेष ढळढळीत असें काम हुक्क्यावर वगैरे होत असतें त्यास बिदरी काम असें ह्मणतात. हें नांव बेदर शहरावरून पडलें आहे. बेदरशहर दक्षिण हैद्राबादेपासून पाऊणशे मैलांवर तिच्या वायव्येस निजामाच्या राज्यांत आहे. दंतकथा अशी आहे कीं हें शहर बेदर नांवाच्या एका हिंदु राजानें ख्रिस्ती शकाच्या ४०० शें वर्षांपूर्वी वसविलें. मुसलमानांचे ब्राह्मणी किंवा (बाहामणी ) राज्य ( १३४७ इ. स.) स्थापन होईपर्यंत बेदर गांवीं हिंदुचेंच राज्य होतें. तेथील एका हिंदुराजानें आपलें देवपुजेचें तबक अशा रीतीनें पहिल्यानें तयार करविलें.त्याच्या पश्चात त्याच्या वंशजांनीं या कामांत पुष्कळ सुधारणा करविली. तत्रापि त्यांत हल्लीं दिसून आलेलें कौशल्य मुसलमान राजांच्या वेळी विशेष वाढलें. हें कबूल केलें पाहिजे. तबकासारखे
   ११