पान:देशी हुन्नर.pdf/88

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ८२ ]

देवपुजेचें सामान जाऊन त्याच्या बदला मुसलमानी हुक्के तयार होऊं लागले परंतु कामांत फार सुधारणा झाली. बेदराहून कांहीं कारागीर लखनौस गेले, व तेथेंही या कामाची सुरवात झाली. मुसलमानी राज्य लयास गेल्यावर बिदरी कामासही उतरती कळा लागली. लखनौशहरीं या कामाची सुरवात झाल्यापासून त्याची सुमारें शंभर वर्षे एकसारखीं भरभराट होत होती असें असूनही " औध ग्याझेटियर " या पुस्तकांत त्याजबद्दल कोठें लेख सापडत नाही. मेल बोर्न, कलकत्ता, जयपूर, सिमला व लंडन येथीळ प्रदर्शनांत हा माल जाऊं लागल्यापासून मात्र या कामाचा जास्ती फैलावा होत चालला आहे.

 बिदरी काम हल्लीं बेदर, लखनौ, पुर्णिया, मुर्शिदाबाद या गावीं होत असतें. हें काम करण्यास तीन प्रकारचे कारागीर लागतात. पहिल्यानें ओंतीव भांडें तयार करून तें चरकावर फिरविलें जातें. नंतर त्यांजवर एक कारागीर नक्षी खोदतो, आणि तिसरा त्यांत कोंदणाप्रमाणे सोन्यारुप्याचे पत्रे बसवून त्यास झील देतो. निजामशाहींत मुसलमान व अमीर उमराव नवऱ्या मुलास बिदरी कामाच्या भांडयाचा आहेंर करीत असतात, त्यामुळें या धंद्याला बरीच तेजी आहे. ह्या कामास किंमत जास्ती पडत असल्यामुळें मुलीचा बाप लग्नापूर्वी कित्येक वर्षे तीं जमवून ठेवीत असतो.

 बिदरी कामाची सुरवात मुर्शिदाबादगावीं मीर इलाहिबक्ष नांवाच्या मनुष्यानें सुमारें ८० वर्षांपूर्वी केली. या इलाइबक्षाचा लक्ष्मी नांवाचा एक हिंदु चेला होता, त्याचा मुलगा पन्नालाल यानें या कामांत पुष्कळ सुधारणा केली. पन्नालाल मरून सुमारें ४५ वर्षें झाली. अलीकडे तेथें हें काम मुसलमान लोक करीत आहेत. त्यांत लाडू नांवाच्या एका स्त्रीस हें काम करितां येतें ही गोष्ट विशेष लक्षात ठेवण्यासारखीं आहे. बंदर येथील कारागीर लिंगाईत जातीचे हिंदु आहेत. पुर्णिया येथें कासार जातीच्या चार घराण्यांत या कामास लागणारीं ओंतीव भांडी तयार करितात. हे कासार लोक खुद्द पुर्णिया गांवीं न राहतां तेथून चार मैलांवर बिल्लोरी ह्मणून एक खेडें आहे तेथें जाऊन राहिले आहेत. भांडी खोदून तयार करण्याचें व कोंदणे बसविण्याचें काम खुद्द पुर्णिया गांवीं सोनार लोक 'धनुक ' ह्मणजे मजूर लोक व 'सुरनिज' ह्मणजे दारू विकणारे लोक आणि मुसलमान लोक करितात. लखनौ शहरीं हा व्यापार मुसलमानांच्याच हातीं आहे. परंतु ते कासार लोकांकडून भांडी तयार करून घेऊन कारागीर लोकांकडून बाकीचें काम करून