पान:देशी हुन्नर.pdf/83

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ७७ ]

ठिकाणच्या मिन्यापेक्षां चांगला होतो असें म्हणतात. कुल्लू या गांवीं मिन्याचे दागिने होतात.

 वायव्य प्रांतांत मिन्याच्या कामाबद्दल बनारस शहर सर्व प्रसिद्ध आहे. हें काम लखनौ व रामपूर येथेंही होतें. लखनौच्या कामाचा एक उत्तम नमुना कलकत्ता प्रदर्शनांत आला होता. हें काम एका हुक्यावरती फार चांगलें केलें होतें त्यामुळें तो खरेदी करून कलकत्ता येथील सर्व संग्रहालयांत ठेविला आहे. असा एक दुसरा हुक्का रेवा संस्थानांतूनही कलकत्ता प्रदर्शनांत आला होता. त्याच्या निळ्या रंगावर काढलेलीं पांढरीं फुलें फार सुशोभित दिसत.

 राजपुतान्यांत प्रतापगड या गांवीं खोटा मिना होत असतो. हें काम कसें करितात याची कांहीं माहिती अजून कळली नाहीं. तत्रापि सर जार्ज बर्डवुड साहेब याचें असें ह्मणणें आहे कीं, हिरव्या रंगाचा मिना सोन्याच्या पत्र्यावर ठेवून तो भट्टींत तापवितात. व वितळला म्हणजे त्याच्यावर सोन्याचीं बारीक फुलें, वेल, खबुतरें, पोपट, मोर, हरिणें, घोडे व हत्ती इत्यादिकांची चित्रे ठेवून देतात. मिना निवाला म्हणजे सोन्याच्या कामावर खोदणी करण्याचें काम करून त्याजवरील नक्षी जास्ती उठवून दिसेलशी करितात, कांहीं कांहीं कामावर याच्या उलट प्रकार दिसण्यांत येतो म्हणजे मिन्याचें काम खोदून त्याच्यांत सोनें बसविलेलें आहे असें दिसतें. परंतु हें काम कसें करितात हें कोणास ठाऊक नाहीं. रतलाम येथें असल्या तऱ्हेचें खोटें काम होत असतें.

 ब्रह्मदेशांत होणाऱ्या मिन्याच्या कामाविषयीं मेहेरबान टिली साहेबानें खालीं लिहिलेली माहिती आपल्या पुस्तकांत दिली आहे.

 "हें काम करण्यांत ब्रम्हदेशांतील पुष्कळ सोनार कुशल आहेत, परंतु काम करितांना भट्टीजवळ पुष्कळ वेळ बसून गंधकाचा धूर अंगावर घ्यावा लागतो त्यामुळें काम करण्यास कंटाळतात. काम तयार झालें ह्मणजे असें दिसतें कीं एखाद्या काळ्या पदार्थावर चांदीच्या तारेनें नक्षी काढिली असावी. प्याले, चुनाळ, तबकें, डब्या व चाकुच्या मुठी हेंच पदार्थ मुख्यत्वें करून तयार होतात. व ते इतकें गुळगुळीत असतात कीं त्याजवर हात फिरविला असतां कोठें मिना चढविला आहें हें स्पर्शेंद्रियद्वारानें कळत नाहीं. काळ्या मिन्यांत दोन भाग कथील, एक भाग चांदी व एक भाग तांबें असतें. या जिनसा विस्तवावर वितळून त्यांजवर कमजास्त मानानें गंधक टाकितात. सुमारें एक अष्टमांश