पान:देशी हुन्नर.pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ७८ ]

इंचा एवढा चांदीचा पत्रा घेऊन त्यांची भांडीं करितात. व त्यांजवर नक्षी काढून तीं खोदतात. काढलेल्या नक्षीच्या रेघायेवढी मात्र जागा जशीच्यातशीच शिल्लक रहातें. बाकीचा सर्व भाव उकरून उकरून खोंदणीनें काढून टाकिलेला असतो. अशारीतीनें भांडे तयार झाल्यावर वर सांगितलेला मिना कुटून त्यांत थोडी सवागी टाकून तो नक्षींतून भरतात. नंतर भांडे लोखंडाच्या जाड पिंजऱ्यांत ठेऊन त्यांच्या भोंवतीं कोळसेर चून खूप आंच देतात. भांडें बाहेर काढून कानसीनें, पालीश कागदानें व कोळशानें घांसतात. व अखेरीस त्यांजवर घोटणी करितात. याकामास " नीलो" असें नांव आहे. त्यांस गिऱ्हाइकें ही पुष्कळ आहेत परंतु काम करणारे थोडे असल्यामुळें त्याची किंमत आलीकडे फार वाढत चालली आहे. ब्रह्मदेशांतील श्वेगइन शहरचा राहणारा मांगपो नांवाचा उत्तम कारागीर असलें काम करण्याबद्दल एका तोळ्यास तीन रुपये घेतों."

पत्री काम.

 तांब्याचें किंवा पितळ्याचें भांडे करून त्याच्यावर खंडोबाच्या टाका प्रमाणें चांदीच्या पत्र्याचें ठोकून केलेले पूतळे डाग लावून बसविलेले असतात अशा कामास पत्री काम ह्मणतात. हीपत्र्याची नक्षी बहुत करून मूर्तीच्याच आकाराची असते, ह्मणून मद्रासेकडे तीस स्वामीची नक्षी असें ह्मणतात. मद्रासेंत देवाला स्वामी ह्मणतात. पत्रीकाम मद्रास इलाख्यांत तंजोर गांवीं होतें. तांब्याची मोठमोठीं भांडीं करून त्यांजवर पहिल्यानें नक्षी ठोकून काढून तींत ठेविलेल्या रिकाम्या जागेंत पत्रीकाम डाग लावून अगर पाचरा सारखे ठोकून किंवा स्क्रू मारून वसवितात. याकामाची साहेबलोकांस फार आवड आहे. त्यामुळें अलीकडे तंजोर गांवीं पत्री कामाची मोठी पेठच वसली आहे. ह्या व धातूच्या इतर भांड्यांचें खाली दिलेलें वर्णन डाक्तर बिडी साहेबांच्या पूस्तकांतून घेतलें आहे.

 " तंजोर येथें 'तांबें व चांदी ' 'पितळ व चांदी' आणि 'पितळ आणि तांबें या तीन मिश्रणांची नक्षीदार भांडी तयार होतात त्याचे तीनप्रकार आहेत. पितळेचे घडीव काम पितळेच्या भांडयांवर केलेलें तांब्याचें पत्रीकाम, व तांब्याच्या भांडयांवर केलेलें चांदीचें पत्रीकाम, कधीं कधीं पितळेच्या व तांब्याच्या भांड्यांवर कथलाचे पत्रीकाम करितात. पितळेचें घडीव काम