पान:देशी हुन्नर.pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ६५ ]



एक जोड जुनागडच्या नवाबानें लंदन येथील प्रदर्शनांत पाठविला होता. गेंड्याच्या शिंगाचे ह्मणजे खड्गपात्राचे चुडे व आंगठ्या खंबायतेहून याच प्रदर्शनांत गेल्या होत्या. राजकोटास व मोंगिर येथें ढोरांच्या शिंगाच्या बांगड्या व आंगठ्या होतात. अबनुसचे व सुपारीच्या लांकडाचेही दागिने मोंगीर येथें करितात. परंतु ते अलीकडेसच होऊं लागले आहेत. व त्यास गिऱ्हाइकेंही पाश्चिमात्यांपैकींच मिळतात. असलें दागिने हल्लीं ग्लासगोच्या प्रदर्शनांत पाठविले आहेत. गळ्यांतील माळा व इतर दागिने आणखी पुष्कळ लांकडापासून किंवा बियापासून आपल्या देशांत तयार करितात. खाली लिहिलेली यादी डाक्तर वॉट साहेबांच्या कोशांतून घेतली आहे.

 गुंज--काळ्या तोंडाच्या गुंजा, शिंप्या, व इतर काळ्या रंगाच्या बिया यांच्या माळा किंवा मणगट्या करितात.
 वालगुंज-- याच्याही माळा करितात.
 अडुळसा-- याच्या लांकडाचे मणी करून उत्तर हिंदुस्थानांत माळा करितात.

 बेल-- याच्या लांकडाचे किंवा फळाच्या कवचीचे मणी कांतून हलक्या जातीचे बंगाली हिंदु लोक आपण मुसलमान नाहीं असे दाखविण्याकरितां आंगावर घालितात.

 सोला-- या लांकडांतील गीर रंगवून व त्याजवर बेगड चढवून मूर्तीवर किंवा नवरा नवरीच्या अंगावर त्याच्या माळा घालितात.

 कृष्णागर--या सुगंधी लाकडाच्या माळा करून शोकी लोक गळ्यांत घालितात.
 सुपारी--सुपाऱ्या कांतून त्याचे मणी करून त्याच्या माळा करितात. मोंगीर येथें सुपारीच्या लाकडाचे दागिने करितात.

 बांबू--मणीपूर येथील तोकुलनाग नांवाच्या जातीचे लोक बांबूची वळीं कानांत घालितात.

 ताड--संताळ जातीच्या मुली ताडपत्राचे दागिने करून अंगावर घालितात दक्षिणेकडे त्याजवर लाखेची नक्षी काढितात.
 तूर--याच्या लाकडाचे मणी करितात.
 कर्दळ--याच्या बियांच्या माळा करितात.

 बजरबट्टू--घोडयाच्या अंगावर घालण्याकरितां व मुसलमान लोक आपल्या