पान:देशी हुन्नर.pdf/70

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ६४ ]

साहेब महशूर ह्मणतात. " हस्तिदंती बांगडी ह्मटली मणजे एक मोठें वळे असतें, त्याच्यावर नक्षी खोदलेली, किंवा जाळी काम खोदून तें कधीं सुशोभित केलेलें आमच्या अजून दृष्टीस पडलें नाही. खरें ह्मटलें असतां एतद्देशीय कारागिरांस असले काम सहज येणार आहे. असल्या बांगड्या तयार न होण्याला कांहीं जातिबितीचा प्रतिबंध असावा असें आह्माला वाटतें. पंजाबांत लग्नाच्यावेळीं मुलीच्या मामानें तीस तांबड्या, हिरव्या, काळ्या किंवा बेगड लाविलेल्या अथवा त्यांजवर बारीक रेघा किंवा वर्तुळें खोदलेल्या अशा हस्तिदंताच्या बांगड्या बक्षीस द्याव्या अशी चाल आहे. उंच वर्णाच्या बायका ह्या हस्तिदंती बांगड्या लग्न झाल्यापासून एक वर्षभर हातांत ठेवून पुढें त्या काढून त्यांच्याबदला सोन्या रुप्याच्या घालितात. हिंदुलोकांतील कांहीं जातीच्या बायका असल्या बांगड्या नेहेमीं वापरतात. परंतु त्यांस रंग दिल्यामुळें हस्तिदंत झांकून जातो. त्या लांकडासारख्या दुसऱ्या एखाद्या अतिस्वस्त पदार्थांच्या केल्या असाव्या असा भास होतो. पंजाबाप्रमाणें मुंबई इलाख्यांत मध्यप्रांतांत राजपुतान्यांत व बंगाल्यांतील कांहीं भागांत बायका हस्तिदंती बांगड्या वापरतात. मुंबई बंदरांत जितका हस्तिदंत आयात होतो त्यांतील बहुतेक भाग राजपुताना रेलवेच्या जोधपूरकडे जाणाऱ्या फांट्यावर पाली नांवाचें एक स्टेशन आहे तिकडे जातो. हा पालीगांव मुंबईपासून अमदाबाद व अजमीर या गांवाहून दिल्लीकडे जाणाऱ्या जुन्या रहदारीच्या रस्त्यावर आहे. या गांवच्या हस्तिदंती बांगड्यांची पूर्वीपासून फार ख्याती आहे. हिंदुस्थानांतील हुन्नर व्यापाराच्या प्रसिद्ध जागा सोडून एखाद्या भलत्याच ठिकाणी असलेल्या आडगांवीं कसा वृद्धिंगत पावतो याचें हें एक उदाहरण आहे. असें कां होतें हें मात्र आमच्या लक्षात येतनाहीं. पाली गांवीं बांगडी करणाऱ्या लोकांच्या दुकानांनी रस्तेच्या रस्ते व्यापून टाकिले आहेत. खांद्यापासून मणगटापर्यंत एका खालोखाल एक अशा हस्तिदंती लहानमोठ्या बांगड्या तयार करितात व त्या राजपुताना प्रांतांतील पश्चिमेकडील बहुतेक सर्व संस्थानांत वापरल्या जातात."
 हत्वा येथील महाराजानीं अबनुसचे व हस्तिदंताचे चुडे कलकत्ता येथील प्रदर्शनांत पाठविले होते. मुंबई, सुरत व अमदाबाद या गांवीं लांकडाचे हस्तिदंतासारखे चुडे करून त्यांजवर लाखेचा तांबडा रंग देतात व वर कधीं कधीं बेगड लावितात. हस्तिदंताच्या चुड्यावर सोन्याचे पत्रे लावून तयार केलेला