पान:देशी हुन्नर.pdf/72

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ६६ ]

गळ्यांत घालण्याकरितां याच्या माळा करितात. मुलांच्या गाठल्यांत बजरबटू असलें म्हणजे दृष्ट पडत नाहीं असें भोळे लोक समजतात.

 भेर्ली माड--याच्या बियांचे मणी होतात.

 गवताचें बीं-- यांत दोन प्रकार आहेत. एकांत बीं बहुतकरून वाटोळें असून पांढरें किंवा काळें असतें. याच्या माळा करितात. हिंदुस्थानाच्या पूर्वेकडील सरहद्दीवरील लोक तें खातात. दुसऱ्या प्रकारचें बीं अर्धा इंच लांब असो. करिन नांवाच्या जातीचे लोक या बियांची पोतीच्या नक्षीप्रमाणें आपल्या कपडयावर नक्षी करितात. असामांतील नाग या जातीचे लोक या बिया कुड्यासारख्या कानांत घालितात, व त्याचे इतर सुबक दागिने बनवितात.

 कापूस--मणीपुराच्या उत्तरेकडील नाग नांवाचे लोक कानांत व डोक्यांत कापसाच्या गुंड्या किंवा झेंडू करून घालतात.

 टेंभूरणी--एका जातीच्या टेंभूरणांच्या लांकडाची कुडीं करून ब्रम्ह देशांतील लोक कानांत घालतात.

 रुद्राक्ष--पंचमुखी रुद्राक्ष शिवभक्त गळ्यांत, कानांत व हातांत घालतात इतकेच नाही तर डोक्यांत सुद्धा त्यांच्या माळा बांधतात. जावा बेटांत उत्पन्न होणारी धाकटे रुद्राक्ष ह्मणून एक जात आहे तिच्या माळा कोंगाडी लोकांत वापरतात. खोटे रुद्राक्ष लांकडाचे करितात. रुद्राक्षाच्या माळा, "ब्रौच", कुंडलें, मणगटया इत्यादि पदार्थ पाश्चिमात्यांस फार प्रिय झालेले आहेत. लंडन येथील प्रदर्शनांत कांहीं व्यापारी चार आण्याची माळ बारा आण्यांस विकीत तरी हजारों खपल्या.

 सिकी--या हिमालय प्रांती उत्पन्न होणाऱ्या झाडाच्या बियाच्या माळा करितात.

 झैतून--वरप्रमाणें

 अलशी-जवस--सहारणपूर येथील सरकारी मळ्यावरील मुख्याधिकारी मि० डुथी यांच्या आढळण्यांत असें आले आहे कीं, अळशीच्या लाकडाचे मणी करितात, परंतु आमच्या इलाख्यांत असें कोठें आढळत नाहीं.

 कमळकाकडी--कमळाचे बीं याच्या माळा करितात.

 तुळस--तुळसीच्या लाकडाच्या मण्याच्या माळा प्रसिद्ध आहेत.