पान:देशी हुन्नर.pdf/54

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ४८ ]

त्या गवताच्या घालण्याचे कारण आमच्या भटजीबोवाजवळ पैसें नाहींत हें असावें अशी त्यांची समजूत आहे. असो, समजुतीपुढें इलाज नाहीं ! बंगाल्यांतील ब्राह्मण अजूनही तरलिकेंत अष्ट धातूंची आंगठी घालितात. अनामिकेंत ह्मणजे आंगठ्याजवळील बोटांत सोन्याची आंगठी घालावी व तरलिकेंत ह्मणजे करांगळी जवळील बोटांत रुप्याची असावी असें हिंदुधर्मांत लिहिलें आहे. प्राचीन काळच्या पुस्तकांत आंगठ्याचें वर्णन ठिकठिकाणीं सांपडतें. दुष्यंतराजाच्या हातांतील आंगठी माशानें गिळिली होती हें सर्वांस माहीतच आहे. द्रोणाचार्याच्या हातांतील आंगठीची गोष्ट खालीं दिली आहे.

 द्रोण हा पांचाळ देशांत राहणारा एक गरीब ब्राह्मण होता. त्याचा मुलगा अश्वत्थामा लहान असतांना शाळेंत शिकावयास जात असे. या शाळेंत पांचाळ राजाचे पुत्र व इतर श्रीमंत घराण्यांतील मुलें जात असत. अभ्यास झाल्यावर सुटीच्या वेळांत पांचाळ राजपूत्र व श्रीमंतांची मुले आपण घरीं काय काय पक्वानें खाल्लीं याबद्दल एकमेकांजवळ गोष्टी सांगत असत. एके दिवशी दुधाची (क्षीर ) गोष्ट निघाली ती ऐकून द्रोणपुत्राच्या मनांत दूध पिण्याची इच्छा झाली, व तो घरी जाऊन आईजवळ दुधाकरितां रडूं लागला. गरीबीमुळें द्रोणाच्या घरीं गाय नव्हती तेव्हां द्रोणपत्नीने पाण्यांत तांदूळ वांटून ते आपल्या मुलास दूध आहे असें सांगून पिण्यास दिले. दुसऱ्या दिवशीं अश्वत्थाम्यानें शाळेंतील मुलांस आपण दूध प्यालों असें मोठ्या फुशारकीनें सांगितलें. तें ऐंकून पांचाळ राजपुत्रांनी त्यास विचारलें अरे ! तुझ्या घरीं गाय नाही तेव्हां दूध आलें कोठून ? अश्वत्थाम्यांनें दूध कसें तयार करितात तें सांगितले त्या बरोबर सर्व मुलांनी टाळ्या वाजवून त्याची टेर केली. हा अपमान सहन न होऊन द्रोण पुत्र ढळढळा रडूं लागला मुलाचें दुःख पाहवेना ह्मणून द्रोणानें पांचाळ राजाकडे जाऊन गाई मागून घेण्याचा निश्चय केला. हा पांचाळ राजा द्रोणाचा गुरूबंधू असूनही त्यानें त्यास ओळख दिली नाहीं इतकेच नाहीं, तर त्याचा अपमान करून त्यास सभेतून हाकलून दिले. शाळेंत असतांना माझें अर्ध राज्य तुला देईन असें कबूल केलेल्या पांचाळाने राज्यमदामुळें उन्मत्त होऊन आपली निर्भर्त्सना केली या अपराधाबद्दल त्यास शिक्षा करण्याचा निश्चय करून देशत्याग करून द्रोण निघाला. तो हस्तनापुरास येऊन पोहोंचला. आतां पुढें काय क-