पान:देशी हुन्नर.pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ४७ ]

 वर्णसर--वरच्या इतकेच पदर असून त्याला हिरे लाविलेले असतात.

 सारिका--नऊ किंवा दहा मोत्यांची गळ्यांत घट्ट बसणारी कंठी.

 वजसंकलिका--नऊ किंवा दहा मोत्यांची कंठी असून तिच्या मागल्या बाजूस पांचेच्या लोलकाचा गोंडा लाविलेला असतो.

 वैकक्षिक--खांद्यावरून ब्राह्मणाच्या यज्ञोपवीतासारखी लोंबणारी एक माळा.

 पदक--निरनिराळ्या आकाराच्या नुसत्या सोन्याच्या किंवा जडावाच्या ताइत्या व पेट्या. त्या जेव्हां सोन्याच्या तारेने गळ्यांत बांधितात तेव्हां त्याला बंधूक असें ह्मणतात. हल्लीं चोहींकडे हिचा उपयोग करितात.

बाहुभूषणें.

 केयूर--हा एक दंडामध्ये घालण्याचा दागिना आहे. हा बाजूबंदाच्या आकाराचा असून त्याच्या दोन्ही तोंडास सिंहाचें किंवा दुसऱ्या जनावराचें तोंड करून बसवितात. हा कधी कधी जडावाचा केलेला असतो. त्याला गोंडा नसला ह्मणजे 'अंगद ' म्हणतात. मुंबईत शेणवी लोक असलीं कडीं नेहमीं दंडामध्यें वापरतात.

 पंचका--हा एक पौंचीच्या आकाराचा दागिना आहे. यांत कधी कधी पुष्कळ ताइत्या व पेट्या असतात.

 कतक--चौकोनी जडावाची सोन्याची पेटी.

कंकणे.

 वलय--सोन्याची सलकडीं अगर बायकांचे गोट.

 चूड--सोन्याच्या तारेचीं कांकणें.

 अर्धचूड--सोन्याच्या तारेचीं बारीक कांकणें.

 कंकण--दात्याचीं कंकणें.

आंगठया.

 पुरातन काळापासून आमच्या देशांत आंगठ्यांचा उपयोग होत आहे. आमचे पूजा करणारे उपाध्याय श्राद्धाच्या वेळीं दर्भाची केलेलीं पवित्रकें घालितात त्यांस सुद्धा बाबू त्रैलोक्यनाथ मुखरजी आंगठ्या म्हणतात. व