पान:देशी हुन्नर.pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ ४२ ]

शाचे, पितळेचे, चांदीचे, सोन्याचे व जवाहिराचे-हे सर्व दागिने आमच्या देशांत तयार होऊन वापरण्यांत येतात. या दागिन्यांपैकी कांहीं कांहीं इतके ओबड धोबड व जड असतात कीं ते अंगावर घालून शेतांत काम करणाऱ्या मुली अडचण व दुःख सोसतांना पाहून त्यांची आपल्यास जरी कीव येते तरी त्यांस ते आपल्या शरीरावर असल्याबद्दल भूषणच वाटत असतें. या स्वस्त किंमतीच्या दागिन्यांतही कांहीं कांहीं मोठे सुरेख व कौशल्य प्रदर्शक असतात. आमचे कारागीर कोठेंही असोत, व कोणतेंही काम करोत, त्यांच्या आंगचे नैसर्गिक कौशल्य दृष्टीस पडल्या शिवाय रहात नाही. पंचधातूसारख्या कडक पदार्थावर छिणींने बारीक ताशींव काम करण्यास पुष्कळ वेळ लागत असल्यामुळें दागिन्यांचीं किंमत अतिशय वाढते हें लक्षात आणून लाखेचे वगैरे स्वस्त दागिने करूं लागण्यास आपली कौशल्यशक्ति ते सहजच खर्च करूं लागले. हे लाखेचे चुडे कधीं कधीं फारच सुंदर असतात. ज्या प्रमाणें पितळ इत्यादि धातूंच्या दागिन्यावर नक्षी करण्यास खर्च जास्त लागतो त्याप्रमाणेच सोन्यारुप्याचे दागिने करण्यांसही घडणावळ कमी पडावी ह्मणून ठळक ठळक नग करण्याची चाल आहे. प्रसंगानुसार पैशाची गरज लागल्यास ह्या दागिन्यांचा उपयोग व्हावा व ते मोडतांना विशेष नुकसान होऊं नये हा विचार घरच्या यजमानास दागिने घडवितांना करावा लागतोच. त्यामुळें बारीक तारेचे डाकील दागिने या देशांत फारसे कोणी करीत नाहीं; तसेच आयते दागिने घेण्याचीही चाल या देशांत फारशी नाहीं.

 मास्किलिन नांवाच्या एका साहेबाने पारिस शहरी सन १८७८ सालीं झालेल्या प्रदर्शनांत गेलेल्या आमच्या देशाच्या दागिन्यांचें खालीं लिहिल्याप्रमाणें वर्णन केले आहे:-

 " स्पर्शद्रियांचे नाजुक काम अति उत्तम प्रकारें करण्यांत हिंदु लोकांच्या बोटांच्या अग्राची बरोबरी कोणाच्यानेंही करवणार नाहीं असे जरी आहे तरी सोन्यारुप्याच्या तारेंचे बारीक काम करण्यास ते लोक सुद्धां मुलांच्या कोमल हातांचा उपयोग करून सुतेऱ्याच्या घरांसारखी अतिशय नाजुक कामें तयार करतात. हें बारिक काम हिंदुस्थान देशांत फारच प्राचीन काळापासून होत आहे; व तें पूर्णदशेस येऊन पोचल्यामुळें अर्वाचीनकाळीं त्यांत सुधारणा होण्यासही मार्ग राहिला नाहीं. प्राचीनकाळीं ग्रीसदेशांतही सोन्यारुप्याच्या तारेचें नाजूक काम करणारे कांहीं कारागीर होते. हल्लींचे हिंदुस्थानांतील कारागीर त्या देशांतील