पान:देशी हुन्नर.pdf/193

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १९५ ]

हींत.त्यांतील कांहीं बरेच दिवस टिकतात परंतु कांहींतर एक दिवस उन्हांत ठेविले तरी उडून जातात. कुसुब्यांत पापडखार घालून त्याच्या योगानें सर्व रंग काढून घेऊन तो लिंबू, हळद, अंबोशी, गुळीचारंग, किरमीज दाणा, मायफळ, पळसाची फुलें, पतंग, बाभळीची साल, इत्यादि पदार्थ कमज्यास्त मानानें घालून कुसुंब्याचे रंग तयार करितात.

चिटें.

 काश्मीर प्रांती चिटें पुष्कळ तयार होतात. त्यांत सांबर गांवीं फारच चांगलें काम होतें. हें कापड विलायतेस जाऊं लागल्यामुळें हल्लीं त्याची किंमत वाढली आहे.

 पंजाब प्रांतीं चिटें गांवोगांव छापतात. ' मांटगोमेरी ' जिल्ह्यांत कोट कमालिया गांवीं, व कपूरस्थळा संस्थानांत सुलतानपूर गांवी होत असलेल्या कांमाची विशेष कीर्ति आहे. अंबाला जिल्ह्यांत चौकडीचें काम छापतात. तें पंजाबांतील डोंगराळ प्रदेशांत राहाणाऱ्या लोकांत ड्याडो ( Dado.) विशेष खपतेंं. सुलतान पुरास ‘डयाडो' नावानें प्रसिद्ध असलेलें कापड छापतात. त्यास साहेब लोकांत गिऱ्हाइकी पुष्कळ असते. लाहोर, मुलतान, हुसन्नाबाद, सियालकोट, अमृतसर, इत्यादि ठिकाणींही पुष्कळ चिटें तयार होतात. कोटकमाली या गांवीं कुंच्यानें कापड रंगविण्याची चाल आहे.

 दिल्ली, कांग्रा, रोहटक, व लाहोर या गांवीं सोन्याच्या वर्खानें छापलेलें कापड तयार होतें.त्याचा साहेबलोक पुष्कळ उपयोग करितात.या प्रांती खडीचेंही काम होतें. राहोन, व जलंदर, या गांवीं छापलेल्या चिटांवर पुष्कळ खळ देण्याची चाल आहे.

 वायव्य प्रांतांत बहुत करून प्रत्येक गांवीं, चिटें छापतात. त्यांत फरूक्काबाद, कनोज, व लखनौहीं मात्र विशेष प्रसिद्ध आहेत. बुलंदशहर जिल्ह्यांत जाहांगिराबादेस व फत्तेपूर जिल्ह्यांत जफरगंज गांवींहीं चांगलें काम होतें. त्या प्रांती थंडीच्या दिवशीं अंगावर घेण्याकरितां, जें छापील कापड वापरतात त्यांस फर्द किंवा रजई ह्मणतात. हें फर्द तसेंच 'लिहॉफ्', 'तोषक', 'पलंगपोस', 'जाजम', 'फर्श', 'शामियाना', 'छिटझर्दा' इत्यादि पुष्कळ प्रकारचें कापड होत असतें. याशिवाय खारव्याचाही व्यापार पुष्कळ आहे. व मथुरेच्या आसपास बांधणी कामही होत असतें.