पान:देशी हुन्नर.pdf/192

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १९४ ]

करुन तें कढत असतांना त्यांत लिंबाच्यारसांतील हस्तिदंत काढून बुडवावा, व जरा आंच द्यावी, मग हस्तिदंत बाहेर काढून धुऊन सुकवावा. जितका लिंबाचा रस हस्तिदंतांत जास्ती मुरला असेल तितका रंग लवकर चढतो.

 सुरंगीचा तांबडा रंगसुरंगीची पूड पावशेर, पावशेर दुधांत घालून खूप कुसकरावी व एकरात्र तशीच भिजत ठेवावी. दुसऱ्याच दिवशीं सकाळीं त्यांत एकशेर पाणी, व दोन तोळे बाळहर्तकीची पूड टाकून उकळवावी. व त्यांत लिंबाच्या रसांत व मिठांत भिजविलेला हस्तिदंत बुडवून अर्धा तास आंच द्यावी. या रंगांत थोडी किरमिजी दाण्याची पूड टाकिली व लिंबाच्या पाण्यांतून काढल्यावर "पालिश' कागदानें हस्तिदंत घासला तर हा रंग जास्ती खुलतो.

 हिरवा रंगलिंबाचा रस व पाणी यांत हस्तिदंत दोन दिवस भिजत ठेवावा. नंतर तो काढून घेऊन त्याच पाण्यांत मोरचुत व जंगाले घालून पुष्कळ घोटावे. व त्यांत पुनः हस्दिदंत टाकून तीन चार दिवस ठेवावा आणि मधून मधुन ढवळीत जावें.

 पोपटी रंगहा हिरव्या रंगाप्रमाणेंच तयार करावयाचा. फरक इतकाच कीं त्यांत मोरचुत घालावयास नको.

 पिंवळा रंगलिंबाच्या रसांत पाणी घालून त्यांत हस्तिदंत तासभरपर्यंत भिजत ठेवावा, नंतर हळदीचा काढा करून तो निववावा, व त्यांत तो हस्तिदंत टाकून २४ तासपर्यंत आंतच राहूं द्यावा. हळदीच्या पाण्यांत केशर घातला तर ज्यास्ती खुलतो.

 काळा रंगलिंबाचा रस घातलेल्या पाण्यांत हस्तिदंत एक तास भिजत ठेवून तो आलित्याच्या रंगांत घालून उकळवावा, दुसरीकडे हरड्या बेहड्याची पूड एकभाग, व हिराकस अर्धाभाग थंड पाण्यांत टाकून त्यांत तयार झालेला तांबडा हस्तिदंत एक दिवस भिजत ठेवावा.
 हस्तिदंतावर मेणानें नक्षी काढून नंतर रंग दिला तर ज्याठिकाणीं नक्षी काढली असेल त्याठिकाणीं तो लागत नाहीं.

कुसुंब्याचा रंग.

 कुसुंब्यापासून पुष्कळ तऱ्हेचे रंग तयार होतात. परंतु ते पक्के होत ना-