पान:देशी हुन्नर.pdf/194

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १९६ ]

 राजपुतान्यांत, जयपूर संस्थानांत, संगानीर गांवांतील चिटाची मोठी प्रख्याति आहे. तसेंच जयपूर, 'बागरू' व कोटा संस्थानांत बराकगांव या ठिकाणीं हीं चिटें तयार होतात. खुद्द बनारसेस खत्री लोकांचीं १०८ घरें आहेत. अजमीर प्रांतीं 'नयानगर' गांवच्या चिटाची विशेष ख्याती आहे. सांबर, जोधपूर, ग्वाल्हेर, रतलाम, उज्जनी, मूंढासू,इंदूर, आणि मध्यहिंदुस्थानांतील इतर पुष्कळ गांवीं चिटें तया होतात.राजपुतान्यांत व मध्याहिंदुस्थानांत खोट्या वर्खाच्या छापाचे कपडे पुष्कळच होत असतात. संबळपुरास 'लुगा' या नांवाचें एक चमत्कारिक प्रकारचें कापड तयार होत असतें तें ओढियाप्रांतांतील बायका नेसतात.
 बंगाल्यांत रंगारी अगदींच थोडे आहेत. कलकत्ता, पाटणा, दरभंगा, व सारण, या गांवीं वायव्य प्रांतांतील कांहीं रंगारी येऊन त्यांनीं दुकानें काढिलीं आहेत. बंगाली लोकांस या कामांत कांहीं समजत नाहीं.
 मद्रास इलाख्यांत, 'वलाज्या', आर्काट, 'मेदेरपॉक' तिंमपूर, अनंतपूर, कुंभकोन, सालेंम, चिंगलपट, कडाप्पा, कोकोनाडा, त्रिचनापल्ली आणि गोदावरी, या सर्व ठिकाणीं कपडे रंगविण्याचे व छापण्याचे कारखाने आहेत.
 मद्रास इलाख्यांत कालीकत शहरीं फार वर्षांपासून कलमदार चिटें करण्याची ह्मणजे छापाशिवाय कलमानें कापडावर नक्षी काढून तें रंगविण्याची वहिवाट आहे. चिटाला इंग्रजीत 'क्यालीको' ह्मणतात, हें ह्या कालिकट शब्दावरूनच होय. (पलंगपोस? ) ह्मणून एका प्रकारचें चीट मद्रास इलाख्यांत निघत असतें त्याजवर पुराणांतील राम, रावण इत्यादिकाची चित्रें असतात.
 ह्या गांवीं जाड्या कागदावर नक्षी काढून तिजवर रांगोळ्या प्रमाणें सुईनें बारीक बारीक भोकें पाडून तो कागद कापडावर ठेऊन त्याजवर कोळशांची पूड चोळतात; त्यामुळें कापडावर नक्षी उठते. कापडावरील कागद काढून घेऊन त्या नक्षीच्या आधारावर कलमानें रंग देतात. असलें काम चिंगलपट जिल्ह्यांत यलिंमबेडू गांवी-उत्तरआर्कट जिल्ह्यांत करनूळ, कलहस्त्री, व वालाज्या गांवीं, दक्षिणआर्कट जिल्ह्यांत अनंतपूर, व 'तिरूपापिलीयम' गांवी, कडाप्पा जिल्ह्यांत, 'जमालअमडुगू व कडाप्पा गांवीं, आणि कृष्णा, मच्छलीपट्टण, व गोदावरी, या सर्व गांवीं कलमदार काम होतें.
 वायव्य प्रांतांत बनारस, व आग्रा, नागपुराजवळ उंबररे, मुंबई इलाख्यांत ठाणें, येवलें, अमदाबाद, सुरत, नाशिक, या ठिकाणीं रेशमी कापडावर रंग देतात.