पान:देशी हुन्नर.pdf/191

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १९३ ]

त्याजवर पहिल्यानें गुळीचा रंग देतात. मग वर लिहिल्याप्रमाणें तांबडा रंग देतात. हाही रंग पक्काच होतो.

 गुलाबीवर प्रमाणें फटकीचें पाणी चढविल्यावर किरमिज दाण्याचा रंग देतात, परंतु त्यांत किरमिज दाणा फार थोडा असतो.

 गुल-इ-अनार( गुलानार ) यांत तांबड्या रंगाप्रमाणेंच सर्व व्यवस्था करावी लागते, मात्र थोडी हळदीची पूड टाकिली ह्मणजे झालें.

 बसंती रंग फटकीचें पाणी देऊन तयार केलेलें कापड इस्पारक, हळद, व डाळिंबाची साल हीं पाण्यांत एकत्र उकळवून त्यांत कपडा बुडवून खालवर पुष्कळ कालवितात.

 पोपटी रंगकापड नुसत्या पाण्यांत भिजवून फटकीच्या पाण्यांत बुडवितात. नंतर इस्पारक आणि हळद या दोहींच्या गरम काढयांत बुडवितात व अखेरीस 'मुरब्बा ' नांवाचा एक पदार्थ अयता बाजारांत विकत मिळतोच तो पाण्यांत टाकून त्यास आंच देऊन कढ आला ह्मणजे त्यांत कापड बुडवून काढितात.

 गुळी, 'सलफ्युरिक' आसिडांत टाकली ह्मणजे त्यापासून 'मुरब्बा ' होतो. हा मुंबईस तयार करितात. तरी काश्मिर देशांतून तयार होऊन आला ह्मणजे त्यास मोल जास्त येतें.

 गहेरा हारा (हिरवा)हा रंग वरच्या रंगाप्रमाणेंच देतात, पाण्यांत 'मुरब्बा' जास्ती घातला ह्मणजे झालें.

 खाकीकपडा पाण्यांत भिजवून हरड्याच्या उकळत काढयांत बुडवून काढितात,नंतर हिराकसाच्या कढत पाण्यांत बुडवून काढून धुऊन सुकवितात.

 गहेरा खाकीहा रंग वरच्या रंगाप्रमाणेंच द्यावा लागतो. फरक इतकाच कीं हरड्याच्या व हिराकसाच्या पाण्यांत कापड जास्ती वेळ ठेवावें लागतें.

हस्तिदंत रंगविणें.

 सुरत व मुंबई या दोन गांवीं हस्तिदंतावर पारशी व हिंदुलोक रंग देतात.  तांबडालिंबाच्या रसांत थोडें मीठ टाकून, व त्यांत पाणी मिसळून त्यांत हस्तिदंत एक तासपर्यंत भिजत ठेवावा. नंतर आळीत्याचे पाणी तयार