पान:देशी हुन्नर.pdf/158

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १६० ]

गुलबदन तयार होते. पंजाबांतील शीखलोकाचें राज्य बुडाल्यापासून तेथें हा व्यापार बुडत चालला आहे.

 साहेबलोक कापड खरेदी करितांना आपल्याप्रमाणें त्याच्या तकाकीकडे पाहत नाहींत. तें मिशमिशीत नसून घट्ट व हातास अगदीं मऊ गुळगुळीत लागणारें असेल तें पाहून घेतात. गुलबदन कापडास हिरवे व तांबडे, नारिंगी व तांबडे, अथवा पिंवळे आणि किरमीजी अशा रंगाचे पट्टे असतात. मुलारी येथील रेशमी कापडाची पूर्वी फार आख्या असे. पेशावर, कोहात, शहापूर आणि भावलपूर या गांवीं रेशमी लुंग्या पुष्कळ तयार होतात. या वस्त्रांत अनेक तऱ्हेच्या रंगांचे मिश्रण असतें इतकेंच नाहीं, तर त्यांत कलाबतू सुद्धां असते. उत्तरहिंदुस्थानांत लुंग्यांचा पागोट्यासारखा उपयोग करितात. पंजाबाच्या सरहद्दीवरील बहुतेक लोक हाच कपडा मस्तकास बांधतात. या कपड्यांची विणकर व त्यांजवरील तरतऱ्हेची नकशी तिजवरून स्काट्लंड देशांतील लोकांच्या ' टार्टन ' नांवाचें कापड वापरणारांच्या जाती प्रमाणें हेंही वापरणाराची जात व उपजात समजते. पंजाबांत कल्ला यानांवाची एक जरीची टोपी असते तिच्या सभोंवती फेटा गुंडाळतात, त्यांस कल्लापेच ह्मणतात तोही या देशांत उत्पन्न होतो. जलंदर गांवीं फक्त रेशमी कापड विणण्याचे शंभरांहून जास्ती माग आहेत असें म्हणतात. तेथें बहुतकरून राखाड्या रंगाचे जरीकांठी दुपट्टे होतात. जेलमगांवीं लुंग्या व इतर कापड होतें. खेस यानांवानें प्रसिद्ध असलेल्या सुती कापडा सारखें रेशमी कापडही त्यांगांवीं विणतात. कांहीं खेस नुसते पांढरे असतात व कांहीं अनेक रंगांच्या चौकटीचे असतात. काहींकांस नुसते जरीचे कांठ असतात व काहींकांस जरीचे कांठ असून आणखी रेशमी कांठही असतात. तांबड्या रंगाचे सुंदर खेस लाहोर येथें होतात, त्यांस गिऱ्हाइकी फार असते. मुसलमानलोकांत लग्न कार्यात रेशमीकापड नवरानवरीस देण्याची चाल आहे त्यामुळें या कापडास गिराइकी असते. सेलचंद या नांवाच्या पलंगाच्या नाड्या, रेशमी गोंडे, चोब्यांकरितां बुतामें इत्यादि पदार्थ सियालकोट, गुर्दासपूर, लाहोर, पतियाला व दिल्ली या गांवीं तयार होतात.

 राजपुताना व मध्यहिंदुस्थान या प्रांतीं रेशमी कापड फार थोडें विणलें जातें. चंदेरीस मात्र कधीं कधीं रेशमी कापड विणतात, मध्यप्रांतांत सिओ-