पान:देशी हुन्नर.pdf/159

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १६१ ]

नी, बिलासपूर, संबळपूर व चंदा, या गांवीं टसर या जातीचें रेशीम उत्पन्न होतें. संबळपूर जिल्ह्यांत बारपळी गांवीं टसर रेशमाचे कपडे फार विणतात. बिलासपूर जिल्ह्यांत मेहेरबान चिस् होल्म या नांवाचे डेपुटी कलेक्टर होते यांणीं तेथें टसर रेशमाचे कपडे विणणाऱ्या लोकांस आणवून त्यांची एक पेंठच वसविली आहे. छत्तीसगड जिल्ह्यांत टसर रेशमांची बंगाली लोकांकरितां धोत्रें विणतात व अंगरख्याचें कापडही विणतात. त्यांत अर्धे रेशीम अर्धे सूत असलें ह्मणजे त्यास बाफ्ता ह्मणतात. बऱ्हाणपूरास मलबारी रेशमाचें कापड तयार होतें, व या गांवीं व नागपूर येथें धोतरजोड्यांचे कांठ विणण्याकडे रेशमाचा फार उपयोग होतो. भंडारा जिल्ह्यांत पावणी आणि अंधरगांव येथें व नागपूर जिल्ह्यांत उमरेर येथें तऱ्हेतऱ्हेच्या रंगाचे रेशमी कांठ होतात त्यांची मोठी आख्या आहे. या कांठांस किरमीज दाणा या नांवाच्या किड्यांपासून झालेल्या रंगाचा उपयोग करितात. त्या गांवचे रंगारीलोकांची अशी समजूत आहे कीं या गांवचें पाणी उत्तम ह्मणून येथें रंग चांगला होतो. अशीच कितीएक ठिकाणच्या रंगारीलोकांची समजूत आहे पण ती खोटी ह्मणण्यास हरकत नाही.

 मद्रास इलाख्यांत उत्तर सालेम, मदुरा जिल्ह्यांत पेरियाकुलं, गुडूर, करनूल,चिंगलपट जिल्ह्यांत,कुंजविराय,गंजम जिल्ह्यांत बऱ्हागपूर,टि्चनापल्ली, बिलारी, कृष्णा, आर्काटं, कडाप्पा, विषागापट्टण, तंजावर, अय्यंपेंठ, व उत्तर आर्काटं जिल्ह्यात व लाजा या सर्व गांवीं रेशमी कापड विणलें जातें. बिलारी येथें रेशमी खण फार उत्तम निघतात. त्यांचे कांठांत सर्व अंगांत ही वेलबुट्टी वगैरे उत्तम प्रकारची नकशी असते. कुंजविराम येथें पांढरें साधें व बुट्टीचें रेशमी कापड तयार होतें. मदुर, चिंगलपट व तंजावर येथें जरीकांठी रेशमी कपडे फार चांगले होतात. मदूऱ्यास कलाबतू तयार करितात परंतु अलीकडे तेथेही विलायती कलाबतू वापरूं लागले आहेत. बुट्टीचें कापड विणण्यासही कलाबतूचा फार उपयोग होतो.

 ह्मैसूरास प्राचीन काळीं रेशमी कापड उत्तम होत असे परंतु त्या देशांतील रेशमी किड्यांस पूर्वी एक वेळ कांहीं रोग होऊन ते फारच मरून गेले. त्यामुळें रेशमाचा व्यापार अगदींच कमी झाला होता परंतु आतां कर्नल लिमेझरर साहेब यांनीं असा रिपोर्ट पाठविला आहे कीं, अलीकडे पुनः तुतीची लागवड