पान:देशी हुन्नर.pdf/157

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १५९ ]

ठिकाणीं मिळतें पण पांढरें रेशीम मिडनापूर येथें मात्र मिळते. तें मार्च महिन्यांत तयार होतें. पिंवळया रेशमापेक्षां पांढऱ्या रेशमांत तकाकी व मऊपणा हीं जास्ती असतात.

 वायव्य प्रांतांत बनारस व आग्रा या दोन गांवीं रेशमी कपडे विशेषेंकरून तयार होतात. बनारसी शालू शेले व दुपेटे यांची सर्व हिंदुस्थानभर आख्या आहे. याशिवाय मुसलमानांकरितां मश्रु नांवाचे गर्भसुती गजनी कापड, उत्तरेकडील स्त्रियांच्या घागऱ्याकरितां संगी नांवाचे कापड, इजारींकरितां गुलबदन नांवाचें कापड, व पट्याकरितां सुसी नांवाचें कापड इत्यादि अनेक प्रकारचें कापड त्या प्रांतीं विणतात. याशिवाय इजारबंद म्हणजे इजारी बांधण्याचे रेशमी पट्टे आग्रा येथें तयार होऊन राजपुताना व मध्याहिंदुस्थान या दोन प्रांतीं जातात. फक्त आग्रयास सुसी व गुलबदन विणण्याचें ३०० माग आहेत. कच्चें रेशीम पंजाब व बंगाल येथून येतें. तयार झालेला माल सर्व हिंदुस्थानभर जातो. आग्रा येथील विणणारे लोक जातीचे मुसलमान आहेत. सगळा दिवस मेहेनत करून त्यांस दररोज तीनच आणे राहतात असें समजते. व विलायतेहून रेशमी कापड येऊं लागल्यामुळें या लोकांच्या धंद्यांत कांहीं हांशील राहिलें नाहीं असेंही कळतें.

 पंजाब प्रांती लाहोर, पटिआला, भावलपूर, मुलतान, अमृतसर, मुलारी, पेशावर, कोहात, जलंदर, व इतरही पुष्कळ ठिकाणीं रेशमी कापड विणतात, हल्लींपेक्षां पूर्वी लाहोरास फार उंची माल निघत असे असें म्हणतात. हल्लीं गुलबदन व दर्यायी या दोन जातीचें कापड विशेष निघतें. त्याची किंमत दर वारास पांच आण्यापासून दीड रुपयापर्यंत असतें. पटिआला येथें गुलबदन कापड व इजारबंद याच दोन जिनसा विशेषेंकरून मिळतात, परंतु पंजाब प्रांती रेशमी कापडाची मुख्य पेंठ म्हटली ह्मणजे भावलपूर होय. तेथील कापडास बहुतकरून आडवे पट्टे असतात व त्यास तकाकी फारच थोडी असतें, तरी ठिकण्यास तेंच उत्तम असतें. अलीकडे मात्र विलायती रंग वापरण्यात येऊं लागल्यामुळें सर्व धंद्यांची दुर्दशा होत चालली आहे. भावलपुराप्रमाणें मुलतानासही पट्ट्याचें रेशमी कापड विणतात त्यांत सुजाखानी हा एक वेगळाच प्रकार आहे. भावलपूर येथील रेशमी कापड पडयांकरितां साहेबलोक पुष्कळ खरेदी करितात.अमृतसरास मुख्यत्वें