पान:देशी हुन्नर.pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १२६ ]

व बांगड्या करण्याकडे जास्ती उपयोग होतो. तिटकुरी व पाती हे दोन जातीचे शंख फारच मोठे असल्यामुळें त्यांचे चुडे करितां येत नाहींत. ते जाड असून त्यांच्या अंगीं लखाखी जास्ती त्यामुळे कोंदण कामांत त्यांचा उपयोग जास्ती होतो.

 कांसवाच्या कवटीच्या पेट्या होतात. कवड्यांच्या टोप्या, अंगरखे, टोपल्या इत्यादि पुष्कळ जिन्नस होतात. बंगाल्यांत कुंकवाच्या करंडीवर कवड्या लावण्याची चाल आहे. जयपुरास तेथील एका नदींत सांपडणाऱ्या शिंप्याचें दागिने होतात.



प्रकरण १० वें.
मातीचीं भांडीं.

 मातीचीं साधीं भांडीं या देशांत अनंत कालापासून होत आहेत. 'घट' ह्मणजे पाण्याची घागर, व 'कलश' ह्मणजे पाणी पिण्याचा तांब्या, या भांड्याचें वर्णन संस्कृत ग्रंथामध्यें जिकडे तिकडे आढळतें. एक वेळ उपयोगांत आणलेलें मडकें धर्म संबंधीं कृत्यांत फेंकून द्यावें लागतें, किंवा फोडून टाकावें लागतें, त्यामुळें मडक्यास गिऱ्हाइकेंही फार आहेत. संक्रातीच्या दिवशीं, अक्षतृतीयेच्यादिवशीं, लग्नांत, मुंजीत, व औध्र्वदेहिकक्रिया करण्यांत मडक्यांची जरूर लागते. पण ही सर्व साध्या मडक्याची गोष्ट झाली रोगण चढविलेलीं मडकीं, ह्मणजे बरण्या, वगैरे जिनसा करण्याची सुरवात आपल्या देशांत अलिकडेच झाली असावी,व ती विद्या चीन देशांतून इराण देशांत जाऊन तिकडून आपल्या देशांत आली असावी असें अनुमान आहे. असल्या भांड्यांस अझुनही आपण चिनी भांडी ह्मणत असतों.

 पंजाबांत दिल्ली, मुलतान व पेशावर या गांवांची चिनी भांड्याबद्दल फार प्रसिद्धि आहे. सुरया, मोठाल्या थाळ्या, आपकोरे, लोटे, व भिंतीस बाहेरून लावायाच्या विटा या जिनसा दिल्लीस होतात. हें काम इराणी कामासारखें दिसते. ज्या मातीची हीं भांडीं करावयाचीं तींत क्षार पदार्थ नसावा. गर