पान:देशी हुन्नर.pdf/131

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[ १२५ ]

पुजेचें संपुष्ट, नंदी, गोमुखी , शिंग, इत्यादि जिनसा मात्र होत असत; परंतु आलीकडे साहेब लोकांकरितां मोठालीं फुलदानें, मेणबत्यांचीं घरें, हरिणें, उंट हत्ती इत्यादि जनावरें व सर्पाच्या अकाराचीं कागदावरील वजनें इत्यादि पदार्थ होऊं लागले आहेत. सुरतेस व मुंबईस होत असलेल्या चंदनाच्या पेट्यावर सांबरशिंगाचें कोंदणकाम होत असतें हें मागें सांगितलेंच आहे. या शिवाय सांबरशिंगाची लहान लहान चित्रें करून त्यांस तांबडा रंग देऊन त्यांजवर वर्ख चढवून सुरतेस तयार करितात. राजकोटास बैलाच्या शिंगाच्या फण्या, कंगवे व इतर पुष्कळ पदार्थ होऊं लागले आहेत.

 बंगाल्यांत सातखीर, कटक, आणि मोंगीर यां गावीं शिंगाचें काम होतें. जयपुरास बैलाच्या शिंगाचीं धनुष्यें करून त्याजवर लांखेचें रोगण चढवून नक्षी करितात. कधीं कधीं शिंगाच्या ढालीही तेथें होतात. राजपुतान्यांत बंदुकीची दारू ठेवण्याकरितां शिंगाचीं तोसदानें करून त्यांजवर हस्तीदंताचें खोंदीव काम करितात. मद्रास इलाख्यांत विजागापट्टण गांवीं शिंगाच्या पेट्या करून त्यांजवर हस्तीदंताचें जाळीकाम करितात. तपकिरीच्या डब्या, छत्र्याच्या मुठी, टांकाच्या दांडया, वगैरे किरकोळ पदार्थ ह्मैसुरास होतात, आंब्याच्या आंकाराची एक तपकिरीची डबी ह्मैसुराहून लंडन प्रदर्शनांत गेली होती. तिजकडे पाहून प्राफेसर रोलो फार खुष झाले व असें ह्मणाले कीं आमच्या जर्मनी देशांत असल्या डब्या पुष्कळ विकतील. नेपाळांत प्याले, अर्घ्ये, डब्या, व आंगठ्या इत्यादि जिनसा खड्गपात्राच्या करितात खड्गपात्राचा अर्घ्यातर्पण करण्यास फार पवित्र मानिला आहे.

शिंपल्याचें काम.

 शंखाचीं कंकणें प्राचीन काळीं होत असत हें दागिन्याच्या सदरा खालीं दाखविलेंच आहे. डाका येथील शंखारी लोक ज्या शिंपल्या वापरितात त्यांस त्यांनीं वेगवेगळालीं नांवे दिलीं आहेत. तिटकुरी, पाती, लालपाती, अलाबेला, धला, कुलई आणि सुरती अशींहीं नांवें आहेत. त्यांत तिटकुरी शिंपली घट्टपणांत, तकाकींत, व रंगांत, फार चांगली मानिलेली आहेत. साध्या चपट्या आंगठी पासून तों उत्तम कांकणापर्यंत किंवा व्याघ्रमुखी कडया पर्यंत शंखाचें काम डाका येथें होतें. सुरती शंख मोठे असल्यामुळें त्यांचा कांकणें