पान:देशी हुन्नर.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ७ ]

नांवाच्या मनुष्यानें लिहिलेल्या गुलिस्तान नामक ग्रंथाची प्रत महाराजा वणीसिंग अलवार येथील तक्ताधिपती यांनीं पन्नास हजार रुपये देऊन काढविली ती. हा ग्रंथ तयार करविण्यास एकंदर खर्च एक लाख रुपये लागला असें म्हणतात. यांतील प्रत्येक पानाची वेलबुटी निरनिराळी आहे (३) महाराणी व्हिक्टोरिया यांच्या वुइन्डसर येथील राजमाहालांत "शाहा जहाननामा " म्हणून एक ग्रंथ आहे तो अयोध्येस बारा हजार रुपयांस खरेंदी केला. (४) पारीस शहरांत फरमिन डिडाट नांवाच्या साहेबांच्या घरीं असले ग्रंथ पुष्कळ आहेत. या गृहस्थाने १८७८ साली झालेल्या प्रदर्शनांत काही ग्रंथ ठेविले होते. आलबर्ट डी मॉन्डेल सो नांवाच्या एका साहेबानें असे लिहून ठेविले आहे, कीं अकबर बाहशाहाच्या दरबारांत असले चोवीस हजार ग्रंथ होते. यंदा (१८८८साली) कलकत्ता येथील सर्वसंग्रहालय म्युझीयमकरितां पाली भाषेंत लिहिलेला असा एक ग्रंथ बाबू त्रिलोकनाथ मुकरजी यांनी १२० रुपयांस खरेदी केला. लखनौ, रामपूर, आग्रा, ग्वाल्हेर इत्यादि शहरीं म्हणजे जेथें जेथें मुसलमान सरदार लोक आहेत तेथें तेथें अजूनही चित्रयुक्त कुराणाच्या प्रती सुमारें शंभर शंभर रुपयांस विकत मिळतात. सन १८८३ च्या कलकत्ताप्रदर्शनांत खालीं लिहिलेलेंं चित्रयुक्त ग्रंथ आलेंं होते. इराणांतील राहणारा मीर इमदाद याने २५० वर्षांपूर्वी लिहिलेला एक ग्रंथ, (२) सन १६८१ साली औरंगजेब बादशहाने जमा केलेले फारशी चित्रयुक्त अक्षराचे उत्तम उत्तम नमुने ज्यांत आहेत असा "मुरक्का" नांवाचा एक ग्रंथ, ( ३ ) शहाजहान बादशहाच्या वेळीं लिहिलेला व त्याच्या हातची त्यांत कांही अक्षरे असलेला असा सुलतान अल्ली मुत्सुद्दी याच्या हातचा “कतात इबु इमान" या नांवाचा कविताबद्ध ग्रंथ, (४) मुर्शिदाबाद येथील नबाब यांनी उत्तम उत्तम अक्षरांचे नमुने दाखविण्याकरितां तयार केलेला "मुरक्का" या नांवाचा दुसरा ग्रंथ, (५) टोंक दरबारांतून आलेला अबदुल रहिमान जामी यानीं रचलेला व हिजरी ९५५ (सुमारे ५० वर्षांपूर्वी ) महंमद ताहीरखान बहादूर याच्या हुकुमावरून महंमद झेद याने नक्कल केलेला " फत्तुहुइ हरामिन " नांवाचा ग्रंथ. हा ग्रंथ एका गृहस्थाने पांच हजार रुपयांस विकत घेऊन अकराशे रुपयांस विकला व तो टोंक सरकारानें १७०० रुपयांस खरेदी केला.

हस्तिदंतावरील चित्रें.

 हीं मुख्यत्वें करून दिल्लीस होतात. रजमनाम्यासारख्या फारशी ग्रंथांत